Home शहरं नाशिक अंगणवाडी सेविकांना सुरक्षा पुरवा

अंगणवाडी सेविकांना सुरक्षा पुरवा


महिला व बालकल्याण समितीची सूचना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यामध्ये वेगाने फैलावणाऱ्या करोना प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना आवश्यक त्या सर्व आरोग्यसुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामीण क्षेत्रातील यंत्रणांची आहे. करोना योद्ध्यांच्या आरोग्य रक्षणाबाबत हेळसांड होता कामा नये, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने दिल्या.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अश्विनी आहेर यांनी याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहून सर्वेक्षण कामी योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. अंगणवाडी सेविकांना त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर नांदगाव नगरपरिषद हद्दीत करोना सर्वेक्षण कामासाठी नेमणूक देण्यात आली. मात्र, त्यासाठी त्यांना सुरक्षा किटही पुरविण्यात आले नसल्याच्या मुद्द्याकडे माध्यमांनी लक्ष वेधले. याच त्रुटीवर बोट ठेवताना सभापती आहेर यांनी काही प्रश्नांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

ग्रामीण भागातील मनुष्यबळ आणताना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडे नगरपरिषदेने मनुष्यबळाची मागणी केली होती का, जिल्हा परिषदेचे मनुष्यबळ कार्यक्षेत्राबाहेर उपलब्ध करून देण्यास सक्षम प्राधिकरण कोणते, यासाठी कुणाच्या परवानग्या घेण्यात आल्या, या नेमणूका करण्यात आलेल्या मनुष्यबळास सुरक्षा किट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कुणाची, या नेमणूका करताना सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतली होती का, या प्रश्नांवर नांदगांव तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवावा, अशा आशयाच्या सूचना सभापती आहेर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केल्या आहेत.

जिल्हा परिषद यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना नगरपरिषदेच्या हद्दीत नेमणूक करून दिल्यानंतर नगरपरिषदेने या कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी किट उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना तसे घडलेले दिसत नसल्याने आहेर यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : दुसऱ्या लाटेस थोपविण्यास प्रशासन सज्ज – the administration is ready to block the second wave

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेचे प्रशासन सज्ज आहे. आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे....

Nashik News : उपसभापती सुनील पाटील अपात्र – deputy speaker sunil patil ineligible

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगावपंचायत समिती सभापती निवडीप्रसंगी बंड करीत राष्ट्रवादी काँग्रेसला जावून मिळालेले भाजपचे करगाव गणाचे पंचायत समिती सदस्य तथा उपसभापती सुनील साहेबराव...

Recent Comments