Home ताज्या बातम्या अखेरचा प्रवासही वेदनादायी, अन्न-पाण्यावाचून मजूर तरुणाचा असा झाला शेवट! | Coronavirus-latest-news

अखेरचा प्रवासही वेदनादायी, अन्न-पाण्यावाचून मजूर तरुणाचा असा झाला शेवट! | Coronavirus-latest-news


दुपारच्या तीव्र उन्हात प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. यातच त्यांना जेवण, पाणीदेखील मिळाले नाही.

जळगाव, 24 मे: मुंबईहून सुटलेल्या श्रमिक एक्स्प्रेसमधील तब्बल 20 तासांच्या वेदनादायी प्रवासात अन्न-पाण्यावाचून एका तरुणाचा मृत्यू झाला. प्रवासादरम्यात त्याची प्रकृती अचानक खालावल्यानं त्याने जीव साडेला. रामकुमार प्यारेलाल निर्मल (26, रा. पुरे टिकाराम, जि. प्रतापगड, मध्य प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मोठा भाऊ व सहकाऱ्यांसोबत मुंबईत मजुरी करीत होता.

हेही वाचा.. मठाधिपतीच्या हत्याकांडाने नांदेड हादरलं, मठात घुसून सेवेकऱ्याचीही निर्घृण हत्या

दिवसभर उन्हात उभी होता श्रमिक एक्स्प्रेस..

लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाल्याने रामकुमार 21 रोजी रात्री 10 वाजता श्रमिक एक्स्प्रेसने भाऊ आणि सहकाऱ्यांसह मूळ गावी निघाला होता. ते सुमारे 20 तासांच्या प्रवासानंतर घरी पोहोचणे अपेक्षित होतं. परंतु रेल्वेमार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे ही एक्स्प्रेस 22 मे रोजी पाचोरा, गाळण, नगरदेवळा, शिरसोली, भादली स्थानकांवरच दिवसभर टप्प्या-टप्प्याने उन्हात उभी होती. दुपारच्या तीव्र उन्हात प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. यातच त्यांना जेवण, पाणीदेखील मिळाले नाही. अखेर ही रेल्वेगाडी सायंकाळी 6.30 वाजता भुसावळ स्टेशनवर पोहोचली. तोपर्यंत रामकुमार याची प्रकृती अधिकच खराब झाली होती. या ठिकाणी रुग्णवाहिका बोलावून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू झाल्यानंतर रात्री 10 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

कोरोनाचा संशय…

रामकुमार याला दुपारपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. यातच त्याला पिण्यासाठी पुरेसे पाणीदेखील मिळाले नाही. त्याला कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याचा संशय वैद्यकीय अधिकाऱ्यांना आहे. त्यानुसार व्हिसेरा राखीव करण्यात आला.

हेही वाचा.. आपला जीव धोक्यात टाकून ‘या’ देशात रुग्णांवर उपचार करत आहेत 65 हजार भारतीय डॉक्टर

दरम्यान, देशभरात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांना रेल्वेने आपापल्या गावी पाठवले जाते आहे. नियमित वेळापत्रकाशिवाय निघालेल्या या रेल्वेगाड्यांचे नियोजन करणे कठीण झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रेल्वेगाड्या थांबून आहेत. नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी 2-3 दिवस उशीर होत आहे. प्रवाशांना अन्न-पाणीही उपलब्ध होत नाही. त्यामुळे हा वेदनादायी प्रवास प्रवाशांच्या जिवावर बेतत आहे.

Tags:

First Published: May 24, 2020 11:36 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

निवडणुकीचे मानधन न मिळाल्यानं शिक्षक संतापले – teachers from niphad did not get paymet of work in gram panchayat election

म. टा. वृत्तसेवा, निफाडतालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली, गावोगावचे कारभारी निवडले गेले, गुलाल उधळला गेला. मात्र या निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजासाठी झटणाऱ्या...

Rishabh Pant: ICC क्रमवारीत ऋषभ पंतने सर्वांना मागे टाकले; विराट कोहली चौथ्या क्रमांकावर घसरला – icc test ranking rishabh pant is the best wicket-keeper...

दुबई: icc test ranking ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत नाबाद ८९ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून देणाऱ्या ऋषभ पंत (rishabh pant)ला एक मोठे बक्षिस...

Recent Comments