Home ताज्या बातम्या अनैतिक संबंधांमुळे मुलाला गच्चीवरून खाली ढकलण्याचा प्रयत्न, आईसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल,...

अनैतिक संबंधांमुळे मुलाला गच्चीवरून खाली ढकलण्याचा प्रयत्न, आईसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल, Ahmednagar crime Charges filed against 4 persons including mother mhas | News


महापालिकेतील दोन जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात गंभीर कलमातंर्गत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

अहमदनगर, 28 जून : अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे अल्पवयीन मुलाच्या घरी जाऊन मारहाण करत त्याचा छळ केल्याच्या आरोपाखाली महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचा प्रमुख शंकर मिसाळ,  महापालिकेतील एक कर्मचारी बाळू घटविसावे यांच्यासह मुलाची आई मनीषा सोनावणे यांच्याविरोधात अखेर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेतील दोन जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात गंभीर कलमातंर्गत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. 13 जून रोजी रात्री साडेआकरा वाजता नगर शहरात राहणाऱ्या  मुलाच्या घरी जाऊन डॉ. अनिल बोरगे, शंकर मिसाळ आणि बाळू घाटविसावे यांनी दारु पिऊन आरडाओरड केली. याबाबत त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी सदर अल्पवयीन मुलास शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे.

मिसाळ आणि बोरगे यांनी यावेळी मुलास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घाटविसावे याने मुलाचे पाय धरून मिसाळ आणि  बोरगे यांनी मुलास गच्चीवरून खाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला. तसेच मिसाळ व बोरगे यांनी तीन महिन्यांपूर्वी घरी येऊन हाताला चटके दिल्याचा आरोप पीडित मुलाकडून करण्यात आला आहे.  

हेही वाचा – टेम्पोतून वास आल्याने पोलिसांना बोलावलं, समोर जे दिसलं ते पाहून सर्वच हादरले

अग्निशमन विभागाचा प्रमुख शंकर मिसाळ हे आणि महानगर पालिकेत नर्स म्हणून काम करत असलेल्या मुलाची आई मनीषा सोनावणे यांचे अनैतिक संबंध असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ते सर्व घरी येत होते. ते घरी आल्यावर नेहमी घरी येऊन दारू पित असत आणि आरडा ओरडा करत असत. त्यांना जाब विचारल्याने त्यांनी मारहाण केल्याचा आरोप मुलाने आहे. त्यामुळे चौघांविरोधात अखेर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published: Jun 28, 2020 11:09 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

सटाण्यातील व्यावसायिक माखिजा यांची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा सटाणा शहरातील बागलाण ब्रॅण्डी हाऊसचे संचालक (वय ६२) यांनी रविवारी सायंकाळी लोहणेर येथील पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी मारून ...

व्यापारी सासूरवाडीला गेला होता, फ्लॅटवर परतल्यानंतर दृश्य बघून हादरलाच

म. टा. प्रतिनिधी, : सासूरवाडीला गेलेल्या कापड व्यवसायिकाचे घर फोडून चोराने दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी (२३ नोव्हेंबर)...

oppo a15: ओप्पोचा हा बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्त, कंपनीकडून मोठी कपात – oppo a15 gets a rs 1,000 price cut in india, know new...

नवी दिल्लीः ओप्पोने आपला बजेट स्मार्टफोन OPPO A15 च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे या फोनची किंमत आता १० हजार रुपयांपेक्षा कमी...

Recent Comments