Home ताज्या बातम्या ...अन् चोप देणारे हात थांबले, चाळीतून मोबाईल चोरणाऱ्या चोराला लोकांनी दिले सोडून!...

…अन् चोप देणारे हात थांबले, चाळीतून मोबाईल चोरणाऱ्या चोराला लोकांनी दिले सोडून! The beating hands stopped leaving the thief to steal the mobile at diva mhss | News‘कामाच्या शोधात गावावरुन आलो होतो पण आता हाताला काम नसल्याने चोरी करू लागलो’

दिवा, 26 जून : लॉकडाउनच्या काळात हातावर काम असलेल्या मजुरांचे अतोनात हाल झाले. गेल्या 3 महिन्यांपासून हाताला काम नसल्यामुळे हे मजूर आता गुन्हेगारीकडे वळायला लागल्याची घटना समोर आली आहे. दिवा येथे चाळीतून मोबाईल चोरणाऱ्या तरुणाला नागरिकांनी पकडल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला.

ठाण्याच्या लगत असलेल्या दिवा येथील साबे गावातील डी जी कॉम्पलेक्स इथं एका चोराला नागरिकांनी मोबाइल चोरताना पकडले होतं. नागरिकांनी या तरुणाला चोप दिला आणि बांधून ठेवले. नागरिकांनी बेदम चोप दिल्यानंतर सुटकेसाठी या तरुणाने गयावया केली.

‘कामाच्या शोधात गावावरुन आलो होतो पण आता हाताला काम नसल्याने चोरी करू लागलो. त्यात गेली 3 महिने अक्षरश: उपासमारीची वेळ आली म्हणून मोबाईल चोरला’ अशी व्यथाच  या तरुणाने मांडली.

चहातल्या साखरेमुळं संपवला आयुष्याचा गोडवा, पतीने पत्नीची गळा चिरून केली हत्या

दिवा येथे बैठ्या चाळी आहेत. खिडकीत ठेवलेले मोबाईल या भागात सहज सापडतात, त्यांच्यावर आम्ही हात साफ करतो आमची एक मोठी टोळी आहे. जी कळव्यात राहते. आमच्या टोळीने आतापर्यंत या भागात खूप चोऱ्या केल्या आहेत, असंही या चोराने कबूल केलं.

चोराची ही कहाणी ऐकून नागरिकांचा राग शांत झाला. त्यानंतर ज्या नागरिकांनी या चोराला पकडले होते, त्याचे हात बांधून सोडून दिले आणि कोणतीही पोलिसांमध्ये तक्रार केली नाही.

संपादन – सचिन साळवे

First Published: Jun 26, 2020 10:15 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : अनुकंपा तत्त्वावर मिळाली पालिकेत ३९ जणांना नोकरी – 39 people got jobs in the municipality on compassionate basis

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'लॉकडाऊन'च्या काळात महापालिकेच्या आस्थापना विभागाने ३९ जणांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली आहे. त्यामुळे अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा अनुशेष भरून निघाल्याचे मानले...

ibps clerk recruitment 2020: सरकारी बँकेत क्लर्क पदावर मोठी भरती; हजारो पदे रिक्त – ibps clerk recruitment 2020 ibps issued notification for clerk jobs

IBPS Clerk Recruitment 2020: सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. तुमच्यासाठी सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे.पदाचे नाव - क्लर्क पदांची...

Delhi Police: महिलेनं मैत्री करण्यास नकार दिला म्हणून असा घेतला सूड… – delhi police arrested 2 they made victim fake facebook profile and put...

नवी दिल्ली : महिलेनं मैत्री करण्यास नकार दिला म्हणून एका विकृत व्यक्तीनं तिचा सूड घेण्यासाठी अजब मार्ग निवडला. या व्यक्तीनं महिलेचा मोबाईल क्रमांक...

Recent Comments