Home मनोरंजन अभिषेक बच्चन: Video: जेव्हा जया बच्चन यांनी सर्वांसमोर करिश्मा कपूरला 'सून' म्हणून...

अभिषेक बच्चन: Video: जेव्हा जया बच्चन यांनी सर्वांसमोर करिश्मा कपूरला ‘सून’ म्हणून हाक मारली होती – jaya bachchan called karisma kapoor daughter in law video viral


मुंबई-अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची लव्ह स्टोरी अनेक वर्ष चर्चेचा विषय होती. दोघांचा साखरपुडा झाल्याचंही म्हटलं गेलं होतं. मात्र नंतर काही कारणांमुळे हे नातं तुटलं. एका कार्यक्रमा दरम्यान जया बच्चन यांनी प्रसार माध्यमांसमोर करिश्माला त्यांची सून म्हणूनच हाक मारली होती. त्यांच्या अशा हाक मारण्याने साऱ्यांचंच लक्ष त्यांच्याकडे वेधून गेलं होतं.

कपूर कुटुंबियांसोबत नातं जोडण्याबाबत जया बच्चन यांनी केलं होतं भाष्य

या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि तिचे सासरेसुद्धा उपस्थित होते. श्वेता नंदाचे लग्न करिश्मा कपूरच्या आत्याच्या मुलाशी निखील नंदाशी झाले आहे. दरम्यान कार्यक्रमात जया यांनी आता बच्चन कुटुंबाचे कपूर कुटुंबाशी थेट संबंध जोडले जाणार असल्याचं म्हटलं होतं. या व्हिडिओमध्ये जया या करिष्माची ओळख त्यांची सून म्हणून करून देतात. एवढंच नाही तर अभिषेकने वडिलांच्या ६० व्या वाढदिवसाला ही सुंदर भेट दिल्याचंही त्या म्हणतात. यानंतर करिष्मा आणि जया एकमेकांना मिठी मारतात.

५ वर्ष होतं अभिषेक आणि करिश्माचं अफेअर

रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांनी जवळपास पाच वर्ष एकमेकांना डेट केलं. त्या काळात त्यांच्या लग्नाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. असं असलं तरी हे नातं फारसं टिकलं नाही. करिश्माने २००३ मध्ये संजय कपूरशी लग्न केलं. दोघांचं ब्रेकअप नक्की का झालं याबद्दलही अनेक चर्चा रंगल्या. त्या काळात अशा बातम्या समोर आल्या की, अभिषेक सिनेमांमध्ये हिट होऊ न शकल्यामुळे या नात्याबाबत बबिता फारशा खूश नव्हत्या. तसेच लग्नानंतर करिश्माने काम करावं अशी जया यांचीही फारशी इच्छा नव्हती. अखेर आईच्या सांगण्यावरूनच करिश्माने अभिषेकसोबतचा साखरपुडा मोडला.

आपआपल्या आयुष्यात पुढे गेले अभिषेक आणि करिश्मा

करिश्मा कपूरने व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं असून आता करिश्मा आणि संजयचा घटस्फोटही झाला आहे. तर अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायशी लग्न केलं. दोघांना आराध्या नावाची सुंदर मुलगी आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Maharashtra govt employees strike: Maharashtra Strike: संपाआधीच ठाकरे सरकारचा इशारा; ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर होणार मोठी कारवाई – will take action against employees if they go...

मुंबई: राज्य शासकीय कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात उद्या (गुरुवारी) संपावर जात आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी तशी नोटीस शासनाला दिली आहे. त्या...

aurangabad News : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना घरीच मतदानाची सोय – senior citizens, disabled people can vote at home

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना 'मोबाइल पोलिंग बुथ'च्या माध्यमातून त्यांच्या घरीच गोपनीय पद्धतीने मतदान करण्याची सुविधा...

sourav ganguly: India vs Australia : रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांच्यापैकी कोणाला संधी मिळायला हवी, सौरव गांगुली म्हणाले – rishabh pant and wridhiman...

सिडनी, india tour of australia 2020 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासन सुरुवात होणार आहे. पण भारताच्या संभाव्य संघात रिषभ पंत...

Recent Comments