Home ताज्या बातम्या अमानवी कृत्य! 14 मृतदेहांसोबत असं कुणी करत का? कर्मचाऱ्यांचा धक्कादायक VIDEO coronavirus...

अमानवी कृत्य! 14 मृतदेहांसोबत असं कुणी करत का? कर्मचाऱ्यांचा धक्कादायक VIDEO coronavirus video viral from kolkata-municipal-corporation-staff dragging-14-dead-bodies mhkk | National


अंत्यसंस्कारासाठी 14 मृतदेह फरफटत नेले, कर्मचाऱ्यांच्या अमानवी कृत्याचा धक्कादायक VIDEO

कोलकाता, 12 जून : देशभरात कोरोनाची दहशत अनेक भागांमध्ये आहे. अशाच स्थितीत एक भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह फरफटत नेल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता इथली घटना आहे. रुग्णालयातील मृतदेह महापालिकेच्या गाडीतून अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

बुधवारी ही घटना गारिया स्मशानभूमीत घडली. त्यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने त्याचा तीव्र निषेध केला जात आहे. या व्हिडीओची सत्यता अद्याप तपासण्यात आली नाही. मात्र हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांनी एक एक मृतदेह फरफटत स्मशानभूमीत नेले. हे मृतदेह कोरोना संक्रमित रुग्णाचे असू शकतात अशी शंकाही व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांनी मोठ्या संख्येनं या घटनेचा निषेध करून आंदोलन केलं.

हे वाचा-COVID-19: भारताने ब्रिटनला टाकलं मागे, मुंबई, दिल्ली सर्वात धोकादायक!

पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्यांनी स्थानिक नागरिकांची समजूत काढली. लोकांनी आंदोलन केल्यानं कर्मचाही हे 14 मृतदेह पुन्हा गाडीत घालून रुग्णालयात घेऊन गेले. हे मृतदेह एनआरएस मेडिकल कॉलेज रुग्णालयातील असल्याचं समोर आल्यानंतर रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी लोकांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र या अमानवीय कृत्याचा सोशल मीडियावर निषेध केला जात आहे.

हे वाचा-बाबा रामदेव यांनी सांगितला Corona वरचा आयुर्वेदिक उपचार, 2 रामबाण औषधींचा शोध

संपादन- क्रांती कानेटकर

First Published: Jun 12, 2020 09:43 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

मास्क न लावणाऱ्यांमुळे वाढू शकतो करोनाचा धोका

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई संसर्गवाढीच्या (उच्चतम बिंदू) महत्त्वाच्या टप्प्यावर मुंबई आली असल्याचे निरीक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वारंवार व्यक्त केले जात असले तरीही ...

आजचं राशीभविष्य… दिनांक २२ ऑक्टोबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक २२ ऑक्टोबर २०२० Source link

Recent Comments