Home ताज्या बातम्या अमित ठाकरेंनी कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांना दिले 1 हजार PPE किट्स आणि मास्क,...

अमित ठाकरेंनी कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांना दिले 1 हजार PPE किट्स आणि मास्क, राज म्हणतात…, Amit raj Thackeray donate 1 thousand ppe kits and masks to covid19 doctors in Mumbai mhak | News


मुंबई 26 एप्रिल: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांसाठी 1 हजार पीपीई किट्स आणि मास्क मार्डकडेला सुपूर्द केलेत. त्यानंतर मार्डने अमित ठाकरेंना आभाराचं पत्र पाठवलं. त्यावर राज ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट करत डॉक्टरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केलीय. तुम्ही आभार मानण्याची गरज नाही आमचं कुटुंबच तुमचं आभारी आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले, आज अमितने महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी १००० पीपीई किट्स आणि मास्क डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेकडे सुपूर्द केले त्याबद्दल मार्डने अमितचे आभार मानले. पण हे डॉक्टर्स जसं जीवावर उदार होऊन महाराष्ट्राची सेवा करत आहेत त्याबद्दल माझं कुटुंबच ह्या डॉक्टरांचे आभार मानू इच्छितो.

दरम्यान, राज्यात आज 440 नवीन रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 8 हजार 68 झाली आहे. तर आज 112 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 1188 झाली आहे.

मुंबईत गेल्या 24 तासांत 358 नवीन रूग्णांची नोंद झाली. विभागात 5407 एकूण रुग्ण झाले असून 204 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज राज्यात 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील 12 तर पुणे महापालिका क्षेत्रातील 3 जळगाव येथील 2 सोलापूर शहर आणि लातूर येथे प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एक लाख 16 हजार 345 रुग्णांची तपासणी केली असून त्यात एक लाख सात हजार 519 रुग्णांची तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तर 8668 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत राज्यात सध्या 604 कंटेनमेंट जून असून 1603 सर्वेक्षण पथक काम करत आहे.

तर देशात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. रुग्ण वाढण्याचा दर कमी होत नाही. देशातील कोरोना रुग्णांची संख्या पोहचली 27 हजाराच्या जवळ. आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 26 हजार 917 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 975 नवीन प्रकरणे तर  24 तासांत 47 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 826 एवढी झाली आहे.

First Published: Apr 26, 2020 11:55 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

America: आवश्यक दिलासा – green card eligibility categories and indian citizens

अमेरिकेत अनेक वर्षे राहून काम करणाऱ्या हजारो भारतीयांना, त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आणि अतिशय आवश्यक असणारा दिलासा अमेरिकी सिनेटने दिला आहे.  Source link

ranjitsinh disale: रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन – cm uddhav thackeray congratulates global teacher winner ranjitsinh disale

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाऊंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

Recent Comments