Home देश अमूल्या लियोना: ...म्हणून 'पाकिस्तान झिंदाबाद' म्हणणाऱ्या अमूल्याचा जामीन अर्ज फेटाळला - bengaluru...

अमूल्या लियोना: …म्हणून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणाऱ्या अमूल्याचा जामीन अर्ज फेटाळला – bengaluru court dismisses bail plea of student chanting pakistan zindabad slogan


बंगळुरू : फेब्रुवारी बंगळुरूत आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा देणाऱ्या अमूल्या लियोना हिची जामीन याचिका फेटाळण्यात आलीय. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात ही रॅली आयोजित करण्यात आली होती. मंचावर ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मसलमीन’ (AIMIM) चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी उपस्थित असताना अमूल्या लियोना हिनं माईक हातात घेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्यानंतर सभेत एकच गोंधळ उडाला होता.

अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही तसंच चौकशी अधिकाऱ्यांनी अद्याप आरोपपत्रही दाखल केलेलं नाही, असं म्हणत अमूल्या हिचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळन लावला. याचिकाकर्तीला जामीन मंजूर केला तर ती फरार होऊ शकते. तसंच अशा पद्धतीच्या गुन्ह्यांत ती पुन्हा सहभागी होऊ शकते. त्यामुळे शांती पुन्हा भंग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे याचिकाकर्तीची याचिका फेटाळण्यायोग्य आहे, असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलंय.

वाचा :‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणारी अमूल्या आहे तरी कोण?
वाचा :ओवेसींसमोर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा देणाऱ्या अमूल्याची कोठडीत

२० फेब्रुवारी रोजी ‘हिंदू मुस्लीम शीख इसाई फेडरेशन’द्वारे ही रॅली आयोजित करण्यात आली होती. असदुद्दीन ओवेसी बोलत असताना स्टेजवर येऊन आणि माईक हातात घेऊन ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या अमूल्याला थांबवण्याचा ओवेसी आणि आयोजकांनी प्रयत्न केला. परंतु, ती थांबली नाही. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून अमूल्या हिला ताब्यात घेतलं. या घटनेमुळे क्षणभर असदुद्दीन ओवेसी यांच्यासहीत सभेचे आयोजकही गोंधळून गेले होते. यानंतर ओवेसी यांनी या घटनेची तत्काळ मंचावरूनच निंदा केली.

माझ्या मुलीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील कार्यक्रमात जे काही केले ते बिलकुल समर्थनीय नाही. ती जे काही म्हटली ते सहन करण्याजोगे नाही, असं म्हणत अमूल्याच्या वडिलांनीही तिच्या या कृत्यावर टीका केली होती.

वाचा : ‘अमूल्यास ठार मारणाऱ्यास बक्षीस’
वाचा :‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा देणाऱ्या अमूल्याचा धक्कादायक खुलासा
वाचा :‘ती’ तरुणी पूर्वीची माओवादीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik vegetable market: भाजीबाजाराचे लिलाव पुन्हा स्थगित – auction of vegetable market postponed again in nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवरजवळ नव्याने तयार करण्यात आलेल्या भाजी मार्केटमधील १४५ विक्रेत्यांना ओटे वाटपासाठी २२ ऑक्टोबर रोजी चिठ्ठी...

Recent Comments