Home ताज्या बातम्या अमेरिकेचा शहाणपणा; कोरोनावरच्या औषधाचा स्टॉक केला खरेदी; इतर देशांना नाही मिळणार Remdesivir...

अमेरिकेचा शहाणपणा; कोरोनावरच्या औषधाचा स्टॉक केला खरेदी; इतर देशांना नाही मिळणार Remdesivir US buys full stock of Covid-19 drug remdesivir mhpl | Coronavirus-latest-news


अमेरिकेने खरेदी केलेला Remdesivir औषधाचा साठा जवळपास तीन महिने पुरेल इतका आहे.

न्यूयॉर्क, 01 जुलै : जगभरात कोरोनाव्हायरसची (coronavirus) संख्या वाढते आहे. अशात काही औषधं कोरोनाव्हायरसविरोधात प्रभावी ठरत आहेत. अशाच औषधांपैकी एक म्हणजे रेमडेसिवीर (Remdesivir). त्यामुळे अमेरिकेनं (America) आता या औषधाचा संपूर्ण स्टॉक खरेदी केला आहे. ज्यामुळे इतर देशांना हे औषध मिळणार नाही.

रेमडेसिवीर हे अँटिव्हायरल औषध आहे. अमेरिकेतल्या गिलियड सायन्स (Gilead Sciences) कंपनीचं हे औषध आहे.  इबोलाशी लढण्याासाठी हे औषध वापरण्यात आलं होते. या औषधामुळे कोरोना रुग्ण लवकर बरा होत असल्याचा दावा केला जातो आहे. यूएस नॅशनल हेल्थ इन्स्टिट्युटमार्फत करण्यात आलेल्या अभ्यासात कोरोना रुग्णांवर या औषधाचा सकारात्मक परिणाम दिसून आला. त्यानंतर यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने या औषधाचा कोरोना रुग्णांवर आपात्कालीन उपचारासाठी वापर करण्यास मंजुरी दिली.

आता अमेरिकेनं या औषधाचा ग्लोबल स्टॉक खरेदी केला आहे. यूएस डिपार्टमेंड ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेजमार्फत 5 लाखांपेक्षा जास्त औषधांचे डोस खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा सचिव अॅलेक्स अजार यांनी सांगतिलं, राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या नागरिकांसाठी सर्वात आधी करार केला आहे. अमेरिकेतल्या कोणत्याही नागरिकाला रेमडेसिवीर गरज असेल तर ती त्याला सहजरित्या उपलब्ध व्हावी, हाच आमचा उद्देश आहे. ट्रम्प सरकार कोरोनाविरोधात आवश्यक उपचार आणि अमेरिकन नागरिकांच्या उपचारासाठी सदैव तत्पर आहे.

भारतातही कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपत्कालीन वापरासाठी या औषधाला परवानगी देण्यात आली आहे.

संपादन – प्रिया लाड

First Published: Jul 1, 2020 07:31 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

कारस्थानांची सत्यकथा

विवेक गोविलकर यांचे '' हे पुस्तक म्हणजे शोध पत्रकारितेचा उत्तम नमुना आहे. वॉल स्ट्रीट जर्नलसाठी काम करणाऱ्या या लेखकाला दोनदा शोध पत्रकारितेचा...

tb hospital mumbai: रुग्णालयात शौचालयात रुग्णाचा कुजलेला मृतदेह – 27 years tb patient body was found in toilet in a tb hospital mumbai

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईशिवडीच्या टीबी रुग्णालयातील शौचालयात रविवारी रुग्णाचा कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, तसेच मृतदेह...

Recent Comments