Home संपादकीय अयोग्य आणि निषेधार्ह

अयोग्य आणि निषेधार्ह


एकीकडे सारा देश आणि जग करोनाच्या संसर्गामुळे टाळेबंदी अनुभवत असताना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नातवाचे लग्न अनेक पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि थाटामाटात पार पडावे, हे आपल्या साऱ्या व्यवस्था आणि यंत्रणा किती पक्षपातीपणे वागतात, हे दाखवून देणारे आहे. नियम मोडून रस्त्यावर येणारे कुठे जोर काढत आहेत, तर कुठे पोलिसांच्या लाठ्या झेलत आहेत. टाळेबंदी यशस्वी करण्यासाठी कधीकधी पोलिस अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही मारहाण करीत आहेत. सामान्य नागरिकांच्या कुटुंबांमध्ये कुणाचे निधन झाले, तरी जवळच्या नातलगांनाही अंत्यदर्शन घेता येत नाही. अशा वेळी, देवेगौडांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे चिरंजीव निखिल यांच्या विवाहाचा मुहूर्त पुढे ढकलला असता, तरी काही बिघडले नसते.

सध्याचा काळ हा एरवी लग्नसराईचा असतो, पण सध्या हजारो विवाहसमांरभ पुढे ढकलावे लागले आहेत. यातून होणारी अब्जावधी रुपयांची उलाढालही थंडावली आहे. या साऱ्या व्यवसायांमध्ये एरवी असणाऱ्या लाखो कामगारांच्या रोजगारावरही गदा आली आहे. याचे कारण, हे सगळे जण केंद्र सरकारने जाहीर केलेली टाळेबंदी प्रामाणिकपणे पाळत आहेत. असे असताना देवेगौडा यांच्या कुटुंबीयांनी संयम पाळला असता, तर ते योग्य ठरले असते. खरे तर, एच. डी. देवेगौडा यांचे वय आता ८६ वर्षे आहे. इतक्या वयाच्या नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. याचा अर्थ, त्यांनी आपली व आपल्या पत्नीचीही आरोग्यसुरक्षा वाऱ्यावर सोडून दिली. या विवाह समारंभाची जी छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत, ती पाहिल्यानंतर दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवण्याचे जे नियम आणि निकष सध्या इतरत्र पाळले जात आहेत, तेही धाब्यावर बसविण्यात आल्याचे स्पष्टच दिसते आहे. कर्नाटक पोलिसांनी ४२ वाहने व शंभराहून अधिक कुटुंबीय, तसेच पाहुणे यांना विशेष पास दिले होते. जीवनाश्यक वस्तू किंवा धान्य घेऊन जाणाऱ्या वाहनांना एकीकडे नीट पास मिळत नसताना देवेगौडा कुटुंबाला मात्र बिनदिक्कत पास मिळाले. आता या विवाह समारंभावर भाजप नेते टीका करीत आहेत. मात्र, राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे, या अनुमतीची नैतिक जबाबदारी भाजप सरकारचीच होती. आता टीका करून नाकाने कांदे सोलण्यात काय अर्थ आहे?Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

नगरमध्ये वेगळंच राजकारण! विरोधी पक्षाच्या उमेदवारासाठी भाजप नेत्याच्या मुलाची मोर्चेबांधणी – former mp dilip gandhi’s son bats for shiv sena leader candidate

हायलाइट्स:अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत वेगळंच राजकारणभाजपच्या माजी खासदाराच्या मुलाची शिवसेनेच्या दिवंगत नेत्याच्या मुलासाठी मोर्चेबांधणीश्रीपाद छिंदम याला अपात्र ठरविल्यानं होतेय पोटनिवडणूकअहमदनगर: नगरमध्ये एकमेकांचे पारंपरिक विरोधक...

Coronavirus In India: Coronavirus : देशात एका दिवसात १६,८३८ रुग्णांची भर तर १३ लाखांचं लसीकरण – covid 19 cases update in india 16838 new...

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत एकूण १६ हजार ८३८ नवे करोना संक्रमित रुग्ण आढळले२४ तासांत ११३ नागरिकांनी गमावला जीवएकाच दिवशी देशभरात १३ लाख ८८ हजार...

Recent Comments