या ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची बैलगाडी वाहून गेले आहे. दोन्ही बैल या पुरातून बाहेर आले. मात्र शेतकरी दाम्पत्य वाहून गेलं.
कन्हैया खंडेलवाल, हिंगोली 19 जून: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरातून बैलगाडी मधून शेतातील आखाड्यावर जात असताना ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुरात बैलगाडी वाहून गेली आहे. या गाडीत असलेले शेतकरी दांम्पत्यही बेपत्ता आहे. प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम सुरू असून रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.
कळमनुरी शहरापासून जवळच असलेल्या एका आखाड्यावर आसोलवाडी येथील कुंडलिकराव आसोले (वय जवळपास 55 वर्षे) व त्यांची पत्नी ध्रुपदाबाई आसोले ( वय जवळपास 50 वर्षे) राहत होते. कळमनुरी येथील एका शेतकऱ्याची जमीन गेल्या पंधरा वर्षापासून भागिनी पद्धतीने ते वाहत होते. शुक्रवारी सायंकाळी हे दोघे पती-पत्नी शेतातील आखाड्यावरून कळमनुरी शहरात दळण दळण्यासाठी व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आले होते.
दळण व इतर सामान घेऊन ते आखाड्यावर जात असतांना पाच वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने बुडखीच्या ओढ्याला पूर आला होता. या ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची बैलगाडी वाहून गेले आहे. दोन्ही बैल या पुरातून बाहेर आले. दुर्देवाने मात्र कुंडलिकराव आसोले व धुरपतबाई आसोले या पुरात वाहून गेले आहेत. घटनास्थळी पोलीस प्रशासन व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन शोध मोहीम सुरू केली आहे. पण अंधार पडल्याने शोध मोहिम अडथळे येत होते. दरम्यान रात्री उशिरापर्यंत या बेपत्ता शेतकरी दांम्पत्याचा शोध लागला नव्हता.
हेही वाचा –
मोदींचं मोठं वक्तव्य : ‘आपल्या सीमेत कोणीही घुसखोरी केलेली नाही’
PMC बँकेच्या ग्राहकांना RBIचा दिलासा, आता काढता येणार मोठी रक्कम
First Published: Jun 19, 2020 10:58 PM IST