Home ताज्या बातम्या अरे देवा! महाराष्ट्राच्याCovid-19 Task Forceच्या तज्ज्ञ डॉक्टरलाच झाला कोरोना, member-of-maharashtras-covid-19-task-force-tests-positive mhak |...

अरे देवा! महाराष्ट्राच्याCovid-19 Task Forceच्या तज्ज्ञ डॉक्टरलाच झाला कोरोना, member-of-maharashtras-covid-19-task-force-tests-positive mhak | News


13 एप्रिलला या टास्क फोर्सची निर्मिती राज्य सरकारने केली होती. डॉ. संजय ओक हे या टास्क फोर्सचे प्रमुख आहेत.

मुंबई 2 जुलै: कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तज्ज्ञ डॉक्टरांचा एक टास्क फोर्स निर्माण केला आहे. ( Maharashtra governments COVID-19 task force ) त्या टास्क फोर्समधल्या एका डॉक्टरांनाच कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचीही माहिती आहे. या टास्क फोर्समध्ये 9 डॉक्टर्स आहेत. महाराष्ट्रात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करणं, नवीन औषधं, उपचार पद्धती याबद्दल माहिती देणं, नवीन उपचार सूचवणं, जगभरात काय सुरू आहे त्याबद्दल सरकारला माहिती देणं असं काम या टास्क फोर्सचं आहे.

13 एप्रिलला या टास्क फोर्सची निर्मिती राज्य सरकारने केली होती. डॉ. संजय ओक (Dr. Sanjay Oak) हे या टास्क फोर्सचे प्रमुख आहेत.

दरम्यान,  पुण्यात कोरोना बाधितांची संख्या (Corona patients in Pune) दिवसेंदिवस वाढतच आहे. हा उद्रेक आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. Unlock सुरू असल्याने गर्दी वाढली आहे. व्यवहार सुरू होत आहेत. त्यामुळे बाधितांची संख्याही वाढत आहे. पुण्यात टेस्टिंग (Covid-19 Test)वाढवल्याने जुलै महिन्याअखेर कोरोना बाधितांचा आकडा 40 हजारांचा टप्पा ओलांडू शकतो आणि त्यापैकी 18 हजार पेशंट्स हे Activeअसू शकतात, अशी माहिती पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी ‘न्यूज18 लोकमत’ला दिली.

अमेरिकेत 28 लाख कोरोना रुग्ण; तरी ट्रम्प म्हणतात, ‘कोरोना आपोआप गायब होणार’

पालिकेकडे तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने मनपाकडे उपलब्ध असलेले व्हेंटिलेटरर्स आता ससून हॉस्पिटलला दिले जाणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. तसंच पुण्यात तुर्तास पुन्हा लॉकडाऊनचा कोणताही विचार नसल्याचा खुलासाही आयुक्तांनी केला. यासोबतच लक्षणं नसलेल्या कोरोना पेशंट्सनी विनाकारण बेड्स अडवून ठेऊ नयेत, असंही आवाहन पालिका आयुक्तांनी केलं आहे.

VIDEO : कोरोनामुळे झाला मृत्यू, दफनासाठी 500 मीटर खेचत नेला मृतदेह

पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये  तब्बल1251 रूग्णांची वाढ झाली आहे. यात पुणे मनपा क्षेत्रात 860 , पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात 282, पुणे ग्रामीण हद्दीत 64 तर कॅन्टॉनमेंट परिसरात 45 नवे रूग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवसात झालेली ही जिल्ह्यातील सर्वाधिक वाढ आहे.

 

 

First Published: Jul 2, 2020 06:34 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest: tractor rally : दिल्लीत हिंसक आंदोलन; केंद्राकडून गंभीर दखल, सिंघू सीमेवरून शेतकरी नेते ‘गायब’ – tractor rally violence in farmers protest signs...

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात ( farmers protest ) शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये ( tractor rally ) मंगळवारी हिंसाचार झाला. शेतकरी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड...

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

Recent Comments