Home ताज्या बातम्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन LIVE : आज 'या' क्षेत्रांना मिळणार दिलासा finance minister...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन LIVE : आज ‘या’ क्षेत्रांना मिळणार दिलासा finance minister nirmala sitharam live 5th day of announcing economic package mhjb | National


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजसंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) जी सविस्तर माहिती देत आहेत, त्यासाठी आज शेवटची पत्रकार परिषद होत आहे.

नवी दिल्ली, 17 मे : आज लॉकडाऊन 3.0 चा शेवटचा दिवस आहे, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजसंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) जी सविस्तर माहिती देत आहेत, त्यासाठी आज शेवटची पत्रकार परिषद होत आहे. याआधी 4 टप्प्यांमध्ये विविध क्षेत्रांसाठी अर्थमंत्र्यांकडून दिलासादायक घोषणा करण्यात आल्या आहेत. रविवारी ही पत्रकार परिषद सकाळी 11 वाजता सुरू झाली आहे. आजच्या पाचव्या पत्रकार परिषदेमध्ये गुंतवणूक सेक्टर, ट्रेडिंग या क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. ‘आत्मनिर्भर भारत बनवण्याची गरज आहे’, असं वक्तव्य यावेळी अर्थमंत्र्यानी केले.

मनरेगा, आरोग्य व शिक्षण, व्यवसाय आणि कोव्हिड, कंपनी कायद्याला कायदेशीर रुप देणे, व्यवसायात सुलभता आणणे, पब्लिक सेक्टर आणि त्यासंबधित विषय, राज्य सरकार आणि राज्य सरकारशी निगडीत संसाधने इ. या सात क्षेत्रांवर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये लक्ष केंद्रीत केले जात आहे.

शनिवारी करण्यात आलेल्या महत्त्वाच्या घोषणा (चौथा टप्पा)

-देशातील कोळसा उत्पादनाच्या सुधारणेवर भर देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. याकरता 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. कोळशाच्या व्यावसायिक उत्पादनावर भर देण्यात येणार असून कोळसा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी कमी करण्यात येणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

-संरक्षण क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक 49 टक्क्यांवरून 74 टक्के करण्यात येणार असल्याचही सीतारामन म्हणाल्या. या क्षेत्रात मेक इन इंडियावर भर देण्यात येणार आहे.

-अंतराळ क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला भागीदार बनण्याची संधी देण्यात येईल. खाजगी सेक्टर्सना इस्रोच्या सुविधा मिळतील.

-महत्त्वाच्या 8 क्षेत्रांमध्ये संरचनात्मक सुधारणा (Structural Reform) होणार असल्याचे निर्माला सीतारामन म्हणाल्या. ही महत्त्वाची 8 क्षेत्रे पुढीलप्रमाणे- कोळसा उत्पादन, खनिज उत्पादन, संरक्षण क्षेत्र, हवाईक्षेत्र व्यवस्थापन आणि विमानतळे,  एमआरओ (MRO), अंतराळ, अटॉमिक एनर्जी,  वीज वितरण कंपन्या इत्यादी

शुक्रवारी अर्थमंत्र्यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा (तिसरा टप्पा)

-शुक्रवारी अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्राला जिलासा देणाऱ्या महत्त्वाच्या घोषणा केल्या. शेती क्षेत्राची क्षमता आणि इन्फ्रास्ट्रक्चर विकसीत करण्यासाठी मोठ्या घोषणा त्यावेळी करण्यात आल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांंसाठी 1 लाख कोटी फंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

-EC कायद्यात (Essential Commodities Act) काही बदलाव करण्यात येणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली होती.  ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. त्यांना त्यांचे उत्पादन कमी किंमतीत विकावे लागणार नाही. शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी याकरता कृषी क्षेत्र अधिक स्पर्धात्मक करण्याचा विचार आहे. हा कायदा 1955 पासून जारी आहे.

-पीएम मत्स्य संवर्धन योजनेसाठी 20000 कोटी, फूड प्रोसेसिंगसाठी 10000 कोटी, पशू संवर्धनासाठी 13,343 कोटी तर डेअरी उद्योगासाठी 15000 कोटींची घोषणा. त्याप्रमाणे हर्बल कल्टीव्हेशनसाठी 4000 कोटींची घोषणा करण्यात आली असून मधमाशी पालनासाठी देखील 500 कोटींची घोषणा करण्यात आली आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात करण्यात आलेल्या घोषणा

-इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सुरुवातीलाच ही तारीख वाढवण्यात आली होती. 31 जुलै ऐवजी 31 ऑक्टोबर आणि आता 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत आयकर विवरण भरलं तरी चालणार आहे.

-MSME – सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांची परिभाषा बदलली- आता उत्पादन किती हा निकष असणार नाही. उलाढाल आणि गुंतवणूक याच्या नुसार सूक्ष्म, लघु आणि मध्मम उद्योगांची वर्गवारी करण्यात येईल. त्यानुसार त्यांना सेवा उद्योगांनाही तेच नियम लागू होणार. आधीचे निकष बदलून ते आता वाढवण्यात आले आहेत.

-शेतकरी (Farmers) आणि स्थलांतरित मजूर (Migrant) यांच्यासाठी विशेष योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना त्यांनी घोषित केली. स्थलांतरित मजुरांना आधार कार्ड दाखवून रेशन कार्ड नसेल तरी मोफत रेशन मिळू शकणार आहे.

-सर्व स्थलांतरित मजुरांना दोन महिने मोफक धान्य मिळेल. 8 कोटी मजुरांना याचा फायदा मिळणार. रेशन कार्ड नसेल अशा स्थलांतरित मजुरांनासुद्धा 5 किलो तांदूळ आणि 1 किलो डाळ दिली जाईल. राज्य आपापल्या क्षेत्रातल्या मजुरांना ही मदत पोहोचवतील.

-शेतकऱ्यांना कर्जावरचं व्याज माफ होणार. 3 कोटी शेतकऱ्यांना 4.22 लाख कोटींचं कर्ज दिलं आहे. त्यांना पुढचे सहा महिने कर्जाची परतफेड केली नाही तरी चालणार आहे.  25 लाख नवी किसान क्रेडिट कार्ड लोन दिली गेली

बातमी अपडेट होत आहे

Tags:

First Published: May 17, 2020 11:17 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

gupta and verma sent to ed custody: ED Raids on Omkar Group झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळा; ओमकार समूहाचे गुप्ता आणि वर्मा यांना ‘ईडी’ची कोठडी –...

हायलाइट्स:'ओमकार रियल्टर्स' या कंपनीत २२ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा संशय 'ईडी'ने सोमवारी ओमकार रियल्टर्सच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. ओमकार समूहाचे अध्यक्ष...

sonography centre in aurangabad: सोनोग्राफी केंद्रांवर आता जिल्हाप्रशासनाची नजर – nashik district administration will watch on sonography centre

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादसोनोग्राफी केंद्रामध्ये तीन ते चार महिने गर्भवती असलेली महिला अचानक तपासणीस येणे बंद कसे होते, याबाबत लक्ष देण्यात येणार आहे....

Ajinkya Rahane: ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या राज्यातील पाच क्रिकेटपटूंचा होणार नागरी सत्कार – india tour of australia five cricketers will be honored by state...

हायलाइट्स:ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत विजय मिळवलेल्या संघात चार खेळाडू राज्यातीलया खेळाडूंचा नागरी सत्कार करण्याची मनसेची मागणीक्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनीक्रीडा...

Recent Comments