Home शहरं अहमदनगर अहमदनगर गुन्हे: खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद - accused of...

अहमदनगर गुन्हे: खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद – accused of attempted murder arrested with village gang


म.टा.प्रतिनिधी, नगर

खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. अनिकेत दत्तात्रय कोठावळे (वय २३, रा. सांगवी सुर्या, ता. पारनेर) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी अनिकेत कोठावळे व सुधीर कोठावळे यांनी विलास रामदास कोठावळे (सध्या रा.नाशिक फाटा, पिंपरी चिंचवड, पुणे) यांना त्यांची सांगवी सुर्या या गावातील शेत जमीन दारूच्या धंद्यासाठी मागितली. ती न दिल्याच्या रागातून विलास कोठावळे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने अनिकेत कोठावळे याने त्याच्या जवळील गावठी कट्टा त्यांच्यावर रोखला तसेच सुधीर कोठावळे याने तलवारीने ठार मारण्याची धमकी देऊन तसा प्रयत्न केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पवार यांच्या सूचनेवरून पोलिस पथकाने सांगवी सुर्या येथे सापळा रचून अनिकेत कोठावळे यास जेरबंद केले आहे. आरोपी कडून २५ हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचे पिस्टल, ४०० रुपयांची दोन जिवंत काडतुसे व एक मोबाईल असा ३५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे यांच्यासह पोलिस कर्मचारी दत्ता हींगडे, बबन मखरे, सुनील चव्हाण, रवींद्र कर्डिले, भागीनाथ पंचमूख, अण्णा पवार, सचिन आडबल, विनोद मासाळकर, योगेश सातपुते, प्रकाश वाघ, बाळासाहेब भोपळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा मागील काही वर्षात शेतात सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने तळवाडे दिगर येथील शेतकऱ्याने शुक्रवारी (दि.२२) आपल्या शेतातील...

Bharat Arun: चौथी कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघाने घेतली होती मोठी रिस्क – aus vs ind indian cricket team bowling coach bharat arun reaction on...

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे विजय मिळाल्याचे संघाचे गोलंदाजीचे कोच भरत अरुण ( bharat arun) यांनी सांगितले....

Anna Hazare: अण्णा हजारेंच्या आंदोलनाचे काय होणार? संभ्रम वाढला – no team this time, anna hazare will alone go on fast over farmers issue

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनासाठी यावेळी ‘टीम अण्णा’ तयार करण्यात आलेली नाही. वेळ पडलीच तर हजारे एकटेच उपोषण सुरू करणार, हे...

Recent Comments