Home शहरं अहमदनगर अहमदनगर बातमी: भिंगारमध्ये कंटेन्मेंट झोन, चौदा दिवस पूर्ण शहर राहणार बंद -...

अहमदनगर बातमी: भिंगारमध्ये कंटेन्मेंट झोन, चौदा दिवस पूर्ण शहर राहणार बंद – containment zone in bhingar full city will remain closed for fourteen days


म.टा.प्रतिनिधी, नगर

गेल्या साडे तीन महिन्यांपासून करोनाला लांब ठेवण्यास यशस्वी झालेल्या नगर शहराजवळील भिंगारमध्ये अखेर करोनाने शिरकाव केलाच. या भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी तातडीने भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाने हालचाली सुरू केल्या आहेत. भिंगारमधील लोहार गल्ली, मुळे गल्ली, गवळीवाडा हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी हा आदेश दिला आहे. उर्वरीत भिंगार व सदर बाजार यांचा समावेश बफर झोनमध्ये करण्यात आल्याने पुढील चौदा दिवस संपूर्ण भिंगार शहर बंद राहणार आहे.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नगर शहरामध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. तेव्हापासूनच भिंगार येथे करोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड सतर्क झाले होते. येथील प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्यामुळे जवळपास साडेतीन महिने करोनाला भिंगारपासून लांब ठेवण्यात यश आले होते. मात्र, जून महिन्याच्या अखेरीस भिंगारमध्येही करोनाचा शिरकाव झाला आहे.

आतापर्यंत भिंगारला लोहार गल्ली, मुळे गल्ली व गवळी वाडा या भागात प्रत्येकी एक करोना बाधित सापडला आहे. करोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी वेळीच खबरदारी घेत येथील प्रशासनाने कंटेन्मेंट झोन म्हणून लोहार गल्ली, मुळे गल्ली व गवळी वाडा घोषित केला आहे. या भागातील सर्व दुकाने, कार्यालये, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री सेवा या १४ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. तर, उर्वरीत भिंगार व सदर बाजार यांचा समावेश बफर झोनमध्ये करण्यात आला आहे. बफर झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेसंबंधीत दुकाने, आस्थापना सुरू राहणार असून उर्वरीत सर्व दुकाने, कार्यालये बंद राहणार आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

'रिपब्लिक टीव्ही'विरुद्ध हंसा ग्रुपचा नवा दावा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'टीआरपी घोटाळा प्रकरणात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलच्या () दक्षता पथकासोबत काम करून आम्ही अंतर्गत अहवाल तयार करून त्याआधारे मुंबई...

corona free gram panchayat in thane: करोना वेशीबाहेर – 45 gram panchayat of thane district not found single corona positive patient

म. टा. वृत्तसेवा, ठाणेदेशभरात सर्वत्र करोनाच्या संसर्गामुळे चिंतेचे वातावरण असताना ठाण्यातील ४५ ग्रामपंचायमतींमध्ये आत्तापर्यंत एकही करोनारुग्ण आढळलेला नाही. नियमांचे काटेकोर पालन करत वेगवेगळ्या...

Recent Comments