Home मुंबई नवी मुंबई आईने चिमुकल्याला कंटेनरखाली फेकले

आईने चिमुकल्याला कंटेनरखाली फेकलेम. टा. वृत्तसेवा, नांदेड

प्रेम प्रकरणातून जन्माला आलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याला रागाच्या भरात विवाहितेने कंटेनरखाली फेकून दिल्याने त्याचा चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली.

हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथे राहणाऱ्या एका विवाहितेला विवाहबाह्य संबंधातून २०१८ मध्ये दुसरा मुलगा झाला. या प्रेम प्रकरणाची माहिती तिच्या पतीलाही होती. १८ मे रोजी प्रियकराने या विवाहितेच्या पतीला फोन करून विवाहिता आणि मुलाला बोंढार या त्याच्या गावी सोडण्यास सांगितले. त्यानुसार सर्व जण बोंढारला गेले. २२ मे रोजी विवाहितेचा पती डोंगरकड्याला परतण्यासाठी निघाला असता प्रियकराने महिलेला व मुलाला सांभाळण्यास नकार दिला. त्यामुळे विवाहिता, मुलगा व पती हे गावाकडे जाण्यासाठी पायी निघाले. बोंढार बायपासवर येताच विवाहितेला राग अनावर झाला आणि तिने समोरुन आलेल्या कंटेनरखाली दोन वर्षीय चिमुकल्याला फेकून दिले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Tesla Motors Will Route Its India Investment Through Dutch Arm – टेस्ला भारतात; पण एलन मस्क यांनी टाकला हा मोठा डाव | Maharashtra Times

मुंबई : अमेरिकन ऑटोमोबाइल कंपनी टेस्लाने भारतात येण्यासाठी नेदरलँडचा कर सवलतीचा मार्ग शोधला आहे. टेस्ला अॅम्स्टरडॅम ही टेस्ला मोटर्स अँड एनर्जी इंडियाची मुख्य...

Sameer Khan: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी – mumbai drug case minister nawab malik son in law sameer...

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांना ड्रग्ज प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली...

इच्छूक उमेदवारांकडून भूखंडांचा गैरवापर

म. टा. वृत्तसेवा, निवडणुकीचे बिगूल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमदेवारांकडून मतदारांना खूश करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या...

पतसंस्थांच्या ठेवी होणार सुरक्षित

म. टा. खास प्रतिनिधी, नागरी सहकारी बँकांच्या ठेवींसाठी ज्याप्रमाणे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून (डीआयजीसी) विमा संरक्षण प्राप्त असते त्याचप्रमाणे आता पतसंस्थांतील...

Recent Comments