Home शहरं पुणे आजचा दिवस माझा

आजचा दिवस माझाडॉ. मकरंद ठोंबरेमागील लेखांमध्ये नैराश्याचा उगम कसा होतो व त्याचबरोबर नैराश्य व काही मनोशारीरिक आजार यांचा परस्परसंबंध कसा आहे, याविषयी जाणून घेतले. डिप्रेशनच्या आजारामध्ये लक्षणे वेळीच ओळखणे व योग्य उपचारपद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे; परंतु मानसशास्त्रीय आरोग्याबद्दलची अनास्था, शास्त्रीय माहितीचा अभाव व अशा मानसिक आजारांविषयी असणारे गैरसमज यामुळे उपचार व तज्ज्ञांची मदत घेण्यास विलंब होतो. डिप्रेशनची काही

महत्त्वाची लक्षणेn उदास मनोवस्था : कोणतेही कारण नसताना उगाचच निराश वाटणे, एकटे वाटणे, कोणत्याही गोष्टीत मन न रमणे, छोट्या गोष्टींची खूप काळजी वाटणे, हताश किंवा हतबल होणे, सतत अस्वस्थ वाटणे.n झोपेची अनियमितता : झोप लागायला विनाकारण उशीर होणे, अस्वस्थ झोप लागणे, एकदा जाग आल्यावर झोप न येणे किंवा उठल्यावर उत्साह न वाटणे.n भुकेच्या तक्रारी : भूक अत्यंत कमी होणे किंवा भूक न लागणे, जेवणातील रस कमी होणे, पदार्थांची चव न लागणे, काही जणांमध्ये खूप जास्त खाण्याची इच्छा होणे, गोड पदार्थांचे किंवा अतिरिक्त कॅलरी असलेले पदार्थ खावेसे वाटणे.n थकवा व निरुत्साह : काहीही श्रम न करता थकून जाणे, रोजचा देहधर्म उरकतानाही कंटाळा येणे, विलंब होणे, नुसते बसून किंवा झोपून राहावेसे वाटणे, हॉटेलिंग, सिनेमा, फिरणे अशा करमणुकीच्या गोष्टींमध्येसुद्धा आनंद न वाटणे.n वर्तन असमन्वय : नैराश्याच्या आजारामध्ये विचार, भावना, आकलन, क्षमता, स्मरणशक्ती या सर्वच गोष्टींवर परिणाम होताना दिसतो. मन एकाग्र होऊ शकत नाही, अनेक गोष्टींचा विसर पडतो, बौद्धिक कामे करताना चुका होताना दिसतात.वरील लक्षणे ही डिप्रेशनच्या सर्वसामान्य केसेसमध्ये दिसून येतात. सध्या करोना संक्रमणाच्या व लॉकडाउनच्या आव्हानात्मक काळामध्ये वरीलपैकी काही लक्षणे आपल्यातही आहेत, असे तुम्हाला वाटत असेल, तरीदेखील लक्षणांची तीव्रता, वारंवारिता व कालावधी यावरूनच डिप्रेशनच्या आजाराचे निदान केले पाहिजे. वरीलपैकी तीन ते चार लक्षणे तुमच्यामध्ये एक महिन्यापेक्षा जास्त टिकली व दिसून आली, तर आपल्या आजाराचे तज्ज्ञांकडून वेळीच निदान करून आधी औषधोपचार व नंतर समुपदेशनाचा पर्याय निवडणे उचित ठरेल, असे मला वाटते. (लेखक मानसतज्ज्ञ आणि समुपदेशक आहे.)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Maharashtra Gram Panchayat Nivadnuk Nikal 2021: गिरीश महाजनांनी गड राखला; ४५ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा – girish mahajan win in 45 seat gram panchayat elections

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांचीच सरशी झाली आहे. तालुक्यातील ६८ पैकी तब्बल...

Tesla Motors Will Route Its India Investment Through Dutch Arm – टेस्ला भारतात; पण एलन मस्क यांनी टाकला हा मोठा डाव | Maharashtra Times

मुंबई : अमेरिकन ऑटोमोबाइल कंपनी टेस्लाने भारतात येण्यासाठी नेदरलँडचा कर सवलतीचा मार्ग शोधला आहे. टेस्ला अॅम्स्टरडॅम ही टेस्ला मोटर्स अँड एनर्जी इंडियाची मुख्य...

Sameer Khan: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी – mumbai drug case minister nawab malik son in law sameer...

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांना ड्रग्ज प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली...

इच्छूक उमेदवारांकडून भूखंडांचा गैरवापर

म. टा. वृत्तसेवा, निवडणुकीचे बिगूल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमदेवारांकडून मतदारांना खूश करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या...

Recent Comments