Home ताज्या बातम्या आजही राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ, ओलांडली धोक्याची पातळी, Large increase...

आजही राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ, ओलांडली धोक्याची पातळी, Large increase in the number of covid19 patients in Maharashtra mhak | News


राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 43.29 टक्के एवढं आहे. तर मृत्यूचं प्रमाण 3.48 टक्के एवढं आहे.

मुंबई 4 जून: राज्यात कोरना रुग्णाच्या संख्येत होत असलेली वाढ आजही कायम आहे. गेल्या 24  तासांमध्ये 2933 एवढ्या नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या तब्बल 77,793 एवढी झाली आहे. तर राज्यात आज 123 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2710 एवढी झाली आहे.

सगळे प्रयत्न करूनही आकडा कमी होत नसल्याने सरकारची चिंता वाढली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 68 जण हे मुंबई आणि ठाण्यातले आहेत.

आज 1 352 एवढे रुग्ण बरे झालेत. तर आत्तापर्यंत राज्यात 33681 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 43.29 टक्के एवढं आहे. तर मृत्यूचं प्रमाण 3.48 टक्के एवढं आहे.

दरम्यान, राज्यात एकूण चाचण्यांची संख्या कायम ठेवताना मुंबईतील चाचण्यांची संख्या मात्र 50 टक्क्यांहून अधिक संख्येने कमी करण्यात आल्या आहेत आणि आता राज्यात कोरोनाबळींची संख्या झपाट्याने वाढत आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे.

1 मे 2020 रोजी महाराष्ट्रातील एकूण चाचण्यांमध्ये मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण हे 56 टक्के होते.  त्यानंतर 5 मे 2020 रोजी हे प्रमाण 40.5 टक्क्यांवर आणण्यात आले आणि आता 31 मे 2020 रोजीची आकडेवारी पाहिली तर एकूण महाराष्ट्रातील चाचण्यांच्या तुलनेत मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण हे 27 टक्क्यांवर आले आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या मुंबईत चाचण्यांची कमी होणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब आहे, असं फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

पुणे ATS ची मोठी कारवाई, नारायणगाव येथे एकाला शस्त्रासह उचललं

मुंबईमध्ये चाचण्या वाढविण्याचा आग्रह असण्याचे आणखी एक कारण म्हणजे, 1 मे ते 24 मे दरम्यान झालेल्या चाचण्यांमध्ये पात्र नमुन्यांपैकी युनिक पॉझिटिव्ह नमुने 32 टक्के तर 31 मे रोजी ते जवळपास 31 टक्के आहे. जेव्हा संक्रमणाचा दर इतका अधिक असतो, तेव्हा नमूने तपासणी पूर्वीपेक्षा किमान दोन पटींनी वाढविणे आवश्यक असते.

आता बारमध्ये गेलात तर गर्ल्स नाही ‘रोबोट’ बनविणार तुमचं कॉकटेल!

येथे मात्र ते 50 टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. मात्र, 10 हजार चाचण्यांची क्षमता असताना केवळ 3500 ते 4000 चाचण्याच केवळ मुंबईत होत आहेत. कोरोना रूग्णांची आकडेवाडी कमी-अधिक दाखवून फायदा नाही, तर कोरोना प्रादुर्भावाला अटकाव आवश्यक आहे, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

 

First Published: Jun 4, 2020 08:07 PM IST



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rajasthan Royals: IPL 2020: धोनीच्या चेन्नईची हाराकिरी, राजस्थानने साकारला मोठा विजय – ipl 2020: rajasthan royals beat chennai super kings by 7 wickets

अबुधाबी, IPL 2020 : चेन्नईच्या फलंदाजांना आजच्या सामन्यात सूर गवसला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी १२६ धावांचे माफक...

Recent Comments