चालू वर्षात सोन्याच्या भावात १६ टक्के वाढ झाली आहे. सराफा बाजारात चांदीचे भाव देखील वधारले आहेत. चांदीचा भाव प्रतिकिलो ४८ हजार १२० रुपयांवर गेला आहे. त्यात प्रतिकलो ३ हजार ८५ रुपयांची वाढ झाली आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. मल्टी कमॉडिटी बाजारात () सोन्याचा भाव १० ग्रॅमला ४७६५६ रुपयांवर गेला आहे. तर चांदीचा भाव प्रती किलोला ४८०६५ रुपये झाला आहे.
जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत जात असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्याकडे बघत आहेत.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना महामारीच्या संदर्भात चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोने तेजीत असल्याचे बोलले जात आहे.