Home ताज्या बातम्या आता गुगलच स्वत: delete करणार तुमचा डेटा, आलं आहे हे नवीन फिचर...

आता गुगलच स्वत: delete करणार तुमचा डेटा, आलं आहे हे नवीन फिचर google auto delete search-and-location-history news feature mhkk | Technology


नवी दिल्ली, 25 जून : जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी गुगलने (google) आपल्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये काही नवीन बदल केले आहेत. बऱ्याचदा गुगलमध्ये आपली हिस्ट्री क्लीन करायचं राहून जातं किंवा आपण सरसकट डिलीट करायला जातो. मात्र त्याची आता कोणतीच आवश्यकता नाही. गुगलनं असं फिचर आणलं आहे ज्यामध्ये ऑटोमॅटिक गुगलचा डेटा डिलीट होणार आहे.

नवीन सेटिंग अंतर्गत आता Google 18 महिन्यांनंतर आपलं लोकेशन, हिस्ट्री आणि व्हॉइस कमांडचा डेटा ऑटो डिलीट करणार आहे. याआधी हे फिचर फोनमध्ये उपलब्ध होतंच परंतु ते आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन सुरू करावं लागत होतं. युझर्ससाठी हा पर्याय ठेवण्यात आला होता. आता अपडेटेड सेटिंगमध्ये मात्र हा पर्याय नसेल. यामध्ये ऑटोमॅटिक पद्धतीनं 18 महिन्यांनंतर डेटा डिलीट होणार आहे.

हे वाचा-‘या’ देशात आता करता येणार नाही Whatsapp payment, काय आहे कारण जाणून घ्या

तसेच, कंपनीने यूट्यूबसाठीही हे फिचर आणलं आहे. YouTube वरील सर्च हिस्ट्री याआधी 36 महिन्यांनी हटवली जात होती. त्याचा कालावधी कमी करून 18 महिन्यांपर्यंत असणार आहे. ज्यांच्याकडे हे फिचर आधीपासून उपलब्ध आहे आणि ते वापरत नाही अशा युझर्सना गुगलकडून सतत नोटिफिकेशन येत राहिल. ज्या युझर्सकडे हे उपलब्ध यापूर्वी नव्हते त्यांच्या फोनमध्ये ऑटो डिफॉल्ट अपडेट होताच सेट होईल अशी माहिती मिळाली आहे.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First Published: Jun 25, 2020 11:06 PM IST





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Suraj Mandhare: तलाठ्यांना पुन्हा मिळणार लॅपटॉप – laptops will be distributed to villages talathi says nashik district collector suraj mandhare

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिककंत्राटात निश्चित केलेल्या स्पेसिफिकेशनपेक्षा उच्च दर्जाचे लॅपटॉप असल्यानेच ते तलाठ्यांकडून परत घ्यावे लागल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. हे...

Aurangabad district: मराठवाड्यात १८०० कोटींचे व्यवहार ठप्प – 100 per cent response to strike against gst act condition in aurangabad district

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'जीएसटी' कायद्यातील जाचक तरतुदींविरोधातील व्यापाऱ्यांच्या 'बंद'ला औरंगाबाद जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. केवळ सरकारला जाग येण्यासाठी 'बंद'चे हत्यार उपसावे लागले....

Mumbai Public Schools: पालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशांसाठी अर्जप्रक्रियेला सुरुवात – admission process started in cbse mumbai public schools of bmc

Admissions for BMC's Mumbai Public School: मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात ज्या मुंबई पब्लिक स्कूल्सची घोषणा केली, त्या दहा शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात...

Chitra Wagh: पवारसाहेब, आज मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून: चित्रा वाघ – pawar saheb i miss you very much since this morning says...

हायलाइट्स:'पवार साहेब मला आज सकाळपासून तुमची खूप आठवण येते', असे म्हणत आपले पती किशोर वाघ हे निर्दोष असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी...

Recent Comments