Home ताज्या बातम्या आता तरी लसीकरणाचा वेग वाढवा; मोदी सरकारने ठाकरे सरकारला लिहिलं पत्र |...

आता तरी लसीकरणाचा वेग वाढवा; मोदी सरकारने ठाकरे सरकारला लिहिलं पत्र | Coronavirus-latest-news


महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे (coronavirus in maharashtra) केंद्र सरकारची चिंता अधिक वाढली आहे.

मुंबई, 23 फेब्रुवारी : देशातील सर्वाधिक कोरोना (coronavirus) प्रकरणं महाराष्ट्रात आहे. त्यामुळे देशातील कोरोना (covid 19) रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. याबाबत केंद्र सरकारनंदेखील चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान मोदी सरकारनं आता उद्धव ठाकरे सरकारला पत्र दिलं आहे आणि राज्यातील कोरोना नियंत्रित ठेवण्यासाठी कोरोना लसीकरणाचा (corona vaccination) वेग वाढवा, अशा सूचना केल्या आहेत.

मुंबई, पुणे, ठाणे, अमरावती, नागपूर आणि अकोल्यात कोरोनाची प्रकरणं झपाट्यानं वाढत आहे. वाढत्या कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवा. जास्तीत जास्त आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस द्या, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पत्रात म्हटलं आहे.

हे वाचा – महाराष्ट्रात पुन्हा का होतोय कोरोनाचा उद्रेक? केंद्र सरकारनं सांगितली कारणं

देशात सध्या 1.50 लाखांपेक्षा कमी अॅक्टिव्ह केसेस आहेत. त्यापैकी केरळ आणि महाराष्ट्रातच सर्वाधित आहेत. इथं  50,000 पेक्षा जास्त प्रकरणं म्हणजे जवळपास एकूण प्रकरणांच्या 75% प्रकरणं या दोन राज्यांत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 36.87% आणि केरळमध्ये 37.85% प्रकरणं आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

देशात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाते आहे. मार्चपासून 50 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचंही लसीकरण केलं जाणार आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या नागरिकांचा समावेश असणार आहे.

हे वाचा – ठाकरे सरकारचा मोदी सरकारला जोरदार झटका; Coronil बाबत घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्रातील लसीकरणाचा वेग कमी असल्याचं याआधी केंद्र सरकारनं सांगितलं होतं. तशी आकडेवारीदेखील केंद्रानं जारी केली होती. आता राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे त्याला नियंत्रित करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा, अशी विनंती केंद्रानं केली आहे.


Published by:
Priya Lad


First published:
February 23, 2021, 10:43 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Suraj Mandhare: तलाठ्यांना पुन्हा मिळणार लॅपटॉप – laptops will be distributed to villages talathi says nashik district collector suraj mandhare

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिककंत्राटात निश्चित केलेल्या स्पेसिफिकेशनपेक्षा उच्च दर्जाचे लॅपटॉप असल्यानेच ते तलाठ्यांकडून परत घ्यावे लागल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. हे...

Aurangabad district: मराठवाड्यात १८०० कोटींचे व्यवहार ठप्प – 100 per cent response to strike against gst act condition in aurangabad district

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'जीएसटी' कायद्यातील जाचक तरतुदींविरोधातील व्यापाऱ्यांच्या 'बंद'ला औरंगाबाद जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. केवळ सरकारला जाग येण्यासाठी 'बंद'चे हत्यार उपसावे लागले....

Mumbai Public Schools: पालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशांसाठी अर्जप्रक्रियेला सुरुवात – admission process started in cbse mumbai public schools of bmc

Admissions for BMC's Mumbai Public School: मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात ज्या मुंबई पब्लिक स्कूल्सची घोषणा केली, त्या दहा शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात...

Chitra Wagh: पवारसाहेब, आज मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून: चित्रा वाघ – pawar saheb i miss you very much since this morning says...

हायलाइट्स:'पवार साहेब मला आज सकाळपासून तुमची खूप आठवण येते', असे म्हणत आपले पती किशोर वाघ हे निर्दोष असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी...

Recent Comments