Home ताज्या बातम्या आत्महत्येची चिठ्ठी लिहून गायब झालेले पुण्यातील व्यावसायिक जयपूरमध्ये सापडले A Pune businessman...

आत्महत्येची चिठ्ठी लिहून गायब झालेले पुण्यातील व्यावसायिक जयपूरमध्ये सापडले A Pune businessman who went missing after writing a suicide note was found in Jaipur mhas | Pune


आर्थिक विवंचनेतून ते बेपत्ता झाल्याची तक्रार पुणे पोलिसात दाखल झाली होती.

पुणे, 24 नोव्हेंबर : पुण्यातील प्रसिद्ध ऑटोमोबाइल उद्योजक गौतम पाषाणकर अखेर पुणे पोलिसांना सापडले आहेत. जयपूरमधील एका हॉटेलमध्ये पुणे पोलिसांना आढळून आले आहेत. आर्थिक विवंचनेतून ते बेपत्ता झाल्याची तक्रार पुणे पोलिसात दाखल झाली होती. तेव्हापासून पुणे पोलिसांनी त्यांची शोध मोहीम हाती घेतली होती.

निघून जाण्याआधी उद्योजक गौतम पाषाणकर यांनी सुसाईड नोटही लिहली होती. मात्र त्यानंतर ते पुण्यातून थेट जयपूरपर्यंत पोहोचले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थान राज्यातील जयपूर येथून त्यांना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. जयपूर येथील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते.

गौतम पाषाणकर हे पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. गेल्या 21 ऑक्टोबरपासून ते बेपत्ता होते. व्यवसायात नुकसान झाल्याच्या कारणावरून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ते निघून गेले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये FIR दाखल करण्यात आली होती. पोलिसांची पाच पथकं त्यांचा कसून शोध घेत होती.

दरम्यानच्या काळात ते कोल्हापुरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. असं असताना महिना उलटला तरी पाषाणकर यांचा तपास लागलेला नव्हता. त्यातच त्यांच्या बेपत्ता होण्यामागे एक बडा राजकीय नेता कारणीभूत असल्याची शक्यता त्यांचा मुलगा कपिल यांनी एका तक्रारीद्वारे व्यक्त केली होती.

पाषाणकर यांच्या मुलाच्या आरोपानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागल होतं. अखेर आज पाषाणकर यांचा ठावठिकाणा मिळाला आहे. त्यामुळे या संदर्भातील सर्व शंकांचं लवकरच निरसन होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


Published by:
Akshay Shitole


First published:
November 24, 2020, 5:40 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sharad pawar on madhukar pichad: Sharad Pawar: गेल्या निवडणुकीत काहींच्या अंगात आलं होतं!; पवारांनी ‘या’ नेत्याची काढली पिसं – the behavior of some of...

नगर: ‘मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही नेत्यांच्या अंगात आले होते. त्यामुळे ते चमत्कारिक वागले. ज्यांना पक्षाने भरभरून दिले, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडली. मात्र, शेवटी...

Ajinkya raahne: IND vs AUS : विराट कोहलीला कर्णधारपद दिल्यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रीया, म्हणाला… – ind vs aus : ajinkya rahane given...

नवी दिल्ली, IND vs AUS : अजिंक्यने भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. पण त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अजिंक्यकडून भारतीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात...

Recent Comments