Home शहरं नागपूर आम्ही जातो अमुच्या गावा...

आम्ही जातो अमुच्या गावा…श्रमिकांना घेऊन निघाली विशेष गाडी; प्रत्येक बोगीत सुरक्षा वावरचे केले पालन

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

लॉकडाउनमुळे गेल्या दीड महिन्यापासून नागपुरात अडकलेल्या श्रमिकांना घेऊन ट्रेन रविवारी लखनौकडे रवाना झाली. करोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी सुरक्षित वावरचे पालन करूनच ट्रेनमध्ये प्रवाशांना बसविण्यात आले आहे. ११८० प्रवाशांना घेऊन निघालेली ही ट्रेन थेट लखनौला पोहोचणार असून, तेथील प्रशासन प्रत्येकाला आपापल्या घरी जाण्यासाठी व्यवस्था करून देणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता केंद्र शासनाने देशात लॉकडाउन जाहीर केले. त्यानंतर कामासाठी नागपूर आणि परिसरात आलेले कामगार इथेच अडकून पडले. प्रशासनाने या कामगारांसाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली. अनेक स्वयंसेवी संस्थाही पुढे आल्या. मात्र, आपल्या गावी जाण्याची ओढ या कामगारांमध्ये कायम होती. गावी जाण्यासाठी कुणी पायी निघाले तर कुणी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या. गेल्या दीड महिन्यापासून अनेक समस्या सोसणाऱ्या या श्रमिकांना आता आपल्या घरी जाण्यासाठी प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या श्रमिकांना घेऊन जाणारी पहिली ट्रेन रविवारी निघाली तेव्हा त्या सर्व कामगारांच्या चेहऱ्यावर घरी जाण्याचा आनंद होता. आज अनेकांजवळ पैसे नाहीत. त्यामुळे गाडी असली तरी पैशांअभावी काहींना जाता येणार नाही. त्यामुळे प्रशासनानेच सर्वांची व्यवस्था करावी, अशी भावना पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.

ही गाडी सुटण्याची नियोजित वेळ सायंकाळी ६ वाजताची होती. मात्र, प्रवाशांना ज्या बसेस घेऊन येणार होत्या, त्या उशिरा आल्याने गाडी तब्बल दीड तास उशिरा म्हणजे सायंकाळी ७.३० वाजता सुटली. नागपुरात हजारो कामगार अडकून आहेत. पहिल्या टप्प्यात ११८० प्रवाशांना पाठविण्यात आले. मंगळवारी किंवा बुधवारी आणखी एक गाडी सोडण्याचे नियोजन सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एका कोचमध्ये ४५ जण

देशात करोनाचे संकट असताना श्रमिकांसाठी पाठविण्यात आलेल्या या विशेष ट्रेनमध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. ७२ प्रवाशांची क्षमता असलेल्या एका कोचमध्ये केवळ ४५ प्रवाशांना बसविण्यात आले. साध्या स्लीपर कोचसाठी लागणारे शुल्क या प्रवाशांकडून आकारण्यात आले. नागपूर ते लखनौ प्रवासासाठी एका व्यक्तीला ५०५ रुपये भरावे लागले. या ट्रेनमुळे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या भागातील प्रवाशांना आपल्या गावी जाता आले.

१९ हजार कर्मचारी बाकी

लॉकडाउनमुळे सुमारे २० हजार कर्मचारी नागपूर विभागात अडकले आहेत. यापैकी एक हजारांच्या घरात रविवारी पाठविण्यात आले. उर्वरित १९ हजार श्रमिक, विद्यार्थी यांना पाठविण्याचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील श्रमिक सर्वाधिक आहेत. बिहारला जाण्यासाठी ट्रेनची व्यवस्था करावी लागेल. जवळ असल्याने मध्यप्रदेश आणि छत्तीसगडला जाण्यासाठी बसची व्यवस्था करता येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

राऊतही उशिरा

या गाडीला पालकमंत्री नितीन राऊत हिरवी झेंडी दाखवून रवाना करतील, असे आधी ठरले होते. मात्र, गाडीची वेळ ६ वाजताची असताना ७ वाजले तरी राऊत पोहोचले नव्हते. ७.३०च्या सुमारास त्यांनी प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला त्याचवेळी गाडी सुरू झाली होती. शेवटी त्यांनी सर्वांना हात दाखवून अभिवादन केले व ‘तुमचा प्रवास सुखाचा होवो’, अशा शुभेच्छा दिल्या.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Girgaon Chowpatty: गिरगाव चौपाटीवरून समुद्रकिनाऱ्याचे दर्शन – darshak gallery for tourism on girgaon chowpatty

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईसमुद्राची गाज, खळाळणाऱ्या लाटा, भणभणारा वारा...अशी सुरेल मैफल अनुभवण्यासाठी लवकरच पर्यटकांसाठी गिरगाव चौपाटीवर दर्शक गॅलरी साकारली जाणार आहे. मुंबई...

BJP Agitations: पूजा चव्हाण: भाजपचे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, जळगावात मात्र ‘हे’ घडले – bjp agitation in various parts of the state demanding justice for...

म. टा. प्रतिनिधी, मुंबई भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून राज्यात ठिकठिकाणी पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी पूजाच्या कुटुबीयांना न्याय मिळाला या मागणीसाठी आंदोलन करण्यात...

Jasprit Bumrah: चौथ्या कसोटीसाठी माझा विचार करू नका; भारताच्या गोलंदाजाने BCCIला केली विनंती – jasprit bumrah released from india’s squad ahead of the fourth...

हायलाइट्स:भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह खेळणार नाहीवैयक्तीक कारणामुळे बुमराहने घेतली माघारचौथी कसोटी चार मार्चपासून सुरू होणार अहमदाबाद: भारत आणि...

छत्रपती शिवाजी महाराज: मोठ्या पडद्यावर दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा, बॉलिवूड अभिनेता पेलणार शिवधनुष्य – chhatrapati shivaji maharaj shahid kapoor may play his role...

हायलाइट्स:अश्विन वर्दे करणार महाराजांच्या आयुष्यावर बायोपिकशाहिद कपूरला करण्यात आली विचारणारितेश देशमुखदेखील करणार महाराजांवर चित्रपटमुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्ड सुरू आहे. अनेक नावाजलेल्या व्यक्तिंच्या...

Recent Comments