Home देश आरोग्य सेतू अॅप: आरोग्य सेतु अॅपच्या माध्यमातून डाटा चोरी : राहुल गांधी...

आरोग्य सेतू अॅप: आरोग्य सेतु अॅपच्या माध्यमातून डाटा चोरी : राहुल गांधी – rahul gandhi on aarogya setu app ravi shankar prasad says daily a new lie


नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘कोविड १९’च्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या ‘आरोग्य सेतू’ अॅपच्या माध्यमातून डाटा चोरी आणि गोपनीयतेचा भंग होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ‘राहुल यांचा आणखीन एक खोटारडेपणा’ असं म्हणत प्रत्यूत्तर दिलंय.

‘आरोग्य सेतु एक अत्याधुनिक नजर ठेवणारी यंत्रणा आहे. याला एका खासगी ऑपरेटरला आउटसोर्स करण्यात आलंय. तसंच याच्याशी संबंधित कोणत्याही संस्थेची तपासणी नाही. यामुळे डाटा सुरक्षा आणि गोपनितेबद्दल अनेक चिंता व्यक्त होत आहेत. तंत्रज्ञान आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी मदत करतं, परंतु, नागरिकांना आपल्या संमतीशिवाय त्यांच्यावर नजर ठेवण्याची चिंता असू नये’ असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय.

यापूर्वी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ‘आरोग्य सेतू’शी निगडीत एका प्रश्नावर उत्तर देताना ‘आरोग्य सेतूच्या संदर्भात अनेक तज्ज्ञांनी गोपनीयतेचा मुद्दा मांडला होता. काँग्रेस या मुद्यावर विचार करत आहे’ असं म्हटलं होतं.

राहुल गांधींनी केलेल्या आरोपानंतर माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याला ‘खोटा दावा’ म्हटलंय. ‘श्रीमान गांधी, ज्यांना भारताची समज नाही, अशांना आपले ट्विट आउटसोर्स करणं बंद करण्याची वेळ आलीय’ अशी कोपरखळी मारत प्रसाद यांनी करोनाविरुद्धचं हत्यार असलेलं हे अॅप जगात कौतुकाचा विषय ठरल्याचंही म्हटलंय.

‘प्रत्येक दिवशी एक नवं खोटा दावा… आरोग्य सेतू अॅप जनतेची सुरक्षा करणारं एक शक्तीशाली हत्यार आहे. यात डाटा सुरक्षेची ठोस व्यवस्था आहे. ज्यांचं आयुष्य इतरांवर नजर ठेवण्यावर गेलं त्यांना तंत्रज्ञानाचा वापर विधायक कार्यासाठीही केला जाऊ शकतो, हे समजणार नाही’ असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलंय.

याआधी प्रियंका गांधी यांनीही आरोग्य सेतू अॅपवर टीका केली होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Srinagar terror attack: Srinagar Terror Attack: महाराष्ट्राचा वीरपुत्र यश देशमुख काश्मिरात शहीद; धक्क्याने आई बेशुद्ध – yash deshmukh martyred in terrorist attack in srinagar

जळगाव: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील २२ वर्षीय जवान यश दिंगबर देशमुख हे शहीद...

Mamata Banerjee: ‘असा गृहमंत्री आपण यापूर्वी कधीच पाहिला नाही’ – mamata banerjee alleges pm modi amit shah and bjp farmers protest coronavirus issue

कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक ( west bengal election ) जवळ येताच राजकारणाचा पारा चढत चालला आहे. मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता...

virat kohli: रोहित शर्माच्या दुखापतीबाबत कर्णधार विराट कोहलीने सोडले मौन, म्हणाला… – indian captain virat kohli opens up on lack of clarity, confusion over...

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्यापासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पण ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरु होण्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्माच्या...

Recent Comments