स्मार्टफोनमध्ये आरोग्य सेतू अॅप नसेल तर लॉकडाऊनच्या निर्देशांचं उल्लंघन मानून त्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल, असं अतिरिक्त पोलीस उपायुक्त आशुतोष द्विवेदी यांनी जाहीर केलेल्या निर्देशांत म्हटलंय. लॉकडाऊनच्या निर्देशांच्या उल्लंघनासाठी पोलीस कलम १८८ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५१ ते ६० अंतर्गत कारवाई करत आहेत. यामध्ये दंडाशिवाय तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘आरोग्य सेतू’ अॅपच्या माध्यमातून डाटा चोरी आणि गोपनीयतेचा भंग होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ‘आरोग्य सेतु एक अत्याधुनिक नजर ठेवणारी यंत्रणा आहे. याला एका खासगी ऑपरेटरला आउटसोर्स करण्यात आलंय. तसंच याच्याशी संबंधित कोणत्याही संस्थेची तपासणी नाही. यामुळे डाटा सुरक्षा आणि गोपनितेबद्दल अनेक चिंता व्यक्त होत आहेत’ असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
वाचा :लॉकडाउन ३.०: पाहा, देशात आज पासून काय सुरू, काय बंद?
वाचा :भारत नवे गुंतवणूक केंद्र बनेल; राम माधव यांचा विश्वास
वाचा :हंदवाडा चकमक; देश जवानांचे बलिदान विसरणार नाहीः PM मोदी