Home मनोरंजन आशीष रॉय: आयसीयूमध्ये अभिनेता, उपचारांसाठी नाहीयेत पैसे; लोकांकडे मागितली मदत - sasural...

आशीष रॉय: आयसीयूमध्ये अभिनेता, उपचारांसाठी नाहीयेत पैसे; लोकांकडे मागितली मदत – sasural simar ka fame actor ashiesh roy in icu pleads for financial help


मुंबई- लॉकडाउनमुळे सध्या सिनेमांप्रमाणेच मालिकांचं चित्रीकरणही बंद आहे. त्यामुळे अनेक कलाकारांना पैशांची चिंता सतावत आहे. आर्थिक संकट हळू हळू डोकं वर काढू लागलं आहे. काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेता मनमीन ग्रेवालने आर्थिक तंगीमुळे आत्महत्या केली होती. आता ‘ससुराल सिमर का’ आणि ‘कुछ रंग प्यार के’ अशा मालिकांमध्ये काम केलेले अभिनेता आशीष रॉय यांनी लोकांकडे मदत मागितली आहे.

अनेक दिवसांपासून आशीष रॉय यांची तब्येत खालावलेली आहे. त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं आहे. आजारपणासोबतच त्यांच्यासमोर आर्थिक संकटही आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत लोकांकडून मदत मागितली होती. आशिष यांनी फेसबुकवर लिहिलं होतं की ते फार आजारी असून ते डायलेसिसवर आहेत. शिवाय सध्या ते आयसीयूमध्ये भरती आहेत. अजून एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की त्यांना तात्काळ पैशांची गरज आहे.

नवाजुद्दीनच्या पत्नीने पाठवली घटस्फोटाची नोटीस

या वर्षाच्या सुरुवातीला आशीष यांना आजारपणामुळे इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. त्यांच्या शरीरात ९ लिटर पाणी जमा झालं होतं. मोठ्या प्रयत्नांनी डॉक्टरांनी त्यांच्या शरीरातलं पाणी काढलं. आजारपणासोबतच आशीष रॉय अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. २०१९ मध्ये त्यांना पॅरेलिसीसचा अटॅक आला होता. यातून बाहेर पडल्यानंतर त्यांना मालिकांमध्ये कोणीही काम दिलं नाही. जमापूंजीवर आशीष यांनी अनेक वर्ष काढली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

करोनाने पुन्हा घेतली उसळी

म. टा. खास प्रतिनिधी, जिल्ह्यात करोनाने पुन्हा उसळी घेतली असून, मंगळवारी ४२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे काही दिवसांपासून दोनशे ते तीनशेपर्यंतच सीमित...

virat kohli: IND vs ENG : सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितली कोणाकडून झाली मोठी चुक… – ind vs eng : after winning 3rd test match...

अहमदाबाद, IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला. पण या सामन्यानंतर या लढतीत कोणाकडून मोठी चुक झाली,...

Recent Comments