Home शहरं मुंबई आषाढी एकादशीः अवघे ‘शांत’ पंढरपूर...

आषाढी एकादशीः अवघे ‘शांत’ पंढरपूर…


‌सुनील दिवाण,

आषाढी वारीच्या इतिहासात यंदा करोनामुळे पहिल्यांदाच आषाढ शुद्ध दशमीला पंढरपुरात सगळीकडे शांतता पसरली होती. ज्या मंदिर परिसरात मुंगीलाही शिरायला जागा नसते, तो मंदिर परिसर सुना सुना भासत होता. मानाच्या संतांच्या पादुका सायंकाळी वाखरी येथे पोहोचल्या. प्रत्येकी २० भाविकांसह आलेल्या एसटीमधील सर्व वारकऱ्यांची आरोग्यतपासणी झाल्यानंतर त्या वाखरी पालखी तळावर नेण्यात आल्या. वाखरी येथे सरकारतर्फे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोहळ्याचे स्वागत केले. यानंतर या पालख्यांच्या भेटीला पंढरपुरातून संत नामदेवरायांच्या पादुका सजवलेल्या बसमधून गेल्या आणि येथून सर्व मानाच्या पालख्यांचे बसमधूनच पंढरपुरात आगमन झाले.

पंढरपुरात करोनाचा उद्रेक होऊ नये, यासाठी मंगळवारी दुपारपासून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून, चंद्रभागा वाळवंटही सील करण्यात आला. पंढरपूरचा प्रत्येक रास्ता मोकळा पडला असून, सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, चंद्रभागा तीरावरील सर्व घाट बंद करण्यात आले आहेत. प्रदक्षिणामार्ग, चंद्रभागा वाळवंट, भक्तीमार्ग, रेल्वे स्थानक, बस स्थानक आदी ठिकाणे ओस पडली आहेत. ‘गेल्या अनेक दशकांत आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला असे पंढरपूर आम्ही पाहिलेले नाही. लवकरात लवकर करोनाचे संकट दूर होऊ देत, हीच विठुरायाच्या चरणी आमची प्रार्थना आहे,’ अशी भावना शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांचे आगमन

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई येथून रस्तामार्गे पंढरपुरात रात्री उशिरा पोहोचले. बुधवारी पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा केली जाणार आहे. मानाचा वारकरी म्हणून विठ्ठल मंदिरात देवापुढे विणेकरी म्हणून सेवा देणाऱ्या विठ्ठल बडे या वारकऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या सोबत पूजा करण्याचा मान मिळणार आहे.

मोजक्याच जणांना दर्शन

आषाढी एकादशीला मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, मंदिर सुगंधी फुलांनी सजवण्यात आले आहे. यंदा करोनामुळे मुख्यमंत्री उतरणार असलेले शासकीय विश्रामगृह व विठ्ठल मंदिर येथे मोजक्याच नागरिकांना प्रवेश देण्यात येणार असून, आज एकादशीला फक्त मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांनाच देवाच्या पायावर दर्शन मिळणार असल्याचे मंदिर समिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

anil deshmukh on arnab goswami: Arnab Goswami: अर्णब गोस्वामी यांना अटक होणार?; गृहमंत्री देशमुख यांनी दिले मोठे संकेत – will take action against arnab...

मुंबई:रिपब्लिक टीव्ही वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः...

housewife women: घरकामामुळे जोपासता येईना आवड – women says we are most time is spend in housework therefore not getting time for passion

म. टा. प्रतिनिधी, नाशिकस्वयंपाकघरात अधिक वेळ घालवावा लागत असल्याने आपली आवड जोपासता येत नसल्याचे मत ८४ टक्के महिलांनी नोंदविल्याची माहिती पुढे आली आहे....

manasi naik wedding: शुभ मंगल सावधान! अभिनेत्री मानसी नाईक अडकली विवाहबंधनात – manasi naik ties the knot with pardeep kharera

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक विवाह बंधनात अडकली असून तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा...

hsc exam 2021: बारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना बोर्डाचा मोठा दिलासा – hsc exam 2021 maharashtra boad gives relief to those students with old subjects

राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ या वर्षासाठीच या विषयांची...

Recent Comments