Home शहरं पुणे आषाढी एकादशी- चक्क बसमधून पंढरपूरला आणल्या पादुका

आषाढी एकादशी- चक्क बसमधून पंढरपूरला आणल्या पादुका


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

करोनामुळे यंदा आषाढी वारीसाठी प्रमुख संतांच्या पादुका बसने पंढरपूरला नेण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारी परवानगी दिली. त्यानुसार आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज, देहू येथून संत तुकाराम महाराज आणि सासवडहून संत सोपानदेव महाराज व संत चांगवटेश्वर यांच्या पादुका येत्या मंगळवारी (३० जून) पंढरपूरला नेण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

करोनामुळे यंदा पालखी सोहळा रद्द करण्यात आला. मात्र, आषाढी वारीची परंपरा चालू ठेवण्यासाठी प्रतिकात्मक व प्रतिनिधिक स्वरूपात काही महत्त्वाच्या संतांच्या पादुका पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणींच्या भेटीसाठी नेण्यात येणार आहेत. त्यांना मर्यादित स्वरूपात व केवळ संतांच्या पादुका एसटीद्वारे अथवा वाहनाद्वारे आषाढी एकादशीच्या आधीच्या दिवशी ३० जूनला पंढरपूरला नेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी देवाची, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू, श्री संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड आणि श्री संत चांगवटेश्वर देवस्थान, सासवड येथून चार संतांच्या पादुका नेता येणार आहेत.

पादुका घेऊन परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील, याबाबत योग्य नियोजन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार इन्सिडंट कमांडर म्हणून नेमणुका करण्यात आल्या आहेत. यामध्ये आळंदीहून खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली, देहूमधून हवेलीचे महसूल नायब तहसीलदार संजय भोसले, सासवडहून दौंडचे निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे आणि पुरंदरचे महसूल नायब तहसीलदार उत्तम बढे यांचा समावेश आहे.

या पादुकांचे प्रस्थान झाल्यापासून येथे पोहचेपर्यंत व परत पंढरपूरहून प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत सुरक्षित पोहचाव्यात यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन व जिल्हाधिकारी सोलापूर यांनी नियुक्त केलेल्या विनोद पाटील यांच्याशी समन्वय करून योग्य नियोजन करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.

नियमावलीतील प्रमुख मुद्दे

– पादुकांच्या प्रवासात इन्सिडंट कमांडर सोबत राहणार

– संस्थान प्रमुखांशी विचार करून मार्ग निश्चित

– पादुका घेऊन बस रात्री अकरापर्यंत पंढरपूरला जाणे अपेक्षित

– प्रवासादरम्यान दर्शनासाठी बस थांबणार नाही

– पादुकांसोबतच्या सर्व व्यक्तींना मास्क बंधनकारक

– दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या शक्यतेमुळं लोक धास्तावले!

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्रात करोना संसर्गाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे राज्य पुन्हा लॉकडाउनकडे तर जाणार नाही, अशी अनेकांना धास्ती वाटत आहे. राजकीय...

Asaduddin Owaisi: असदुद्दीन ओवेसींचे अमित शहांना खुले आव्हान, म्हणाले… – This Fight Is Between Hyderabad And Bhagyanagar Says Aimim Chief Asaduddin Owaisi

हैदराबाद: बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election) सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्रीय...

Shiv Sena on Love Jihad: भाजपवाल्यांनी ‘या’ भ्रमातून बाहेर पडावं; शिवसेनेचा इशारा – shiv sena slams bjp for demanding law against love jihad in...

मुंबई: 'लव्ह जिहादच्या विषयावर बांग देऊन महाराष्ट्रातील सरकारला हादरे देऊ, या भ्रमातून भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास...

Recent Comments