Home मनोरंजन आषाढी एकादशी: विठ्ठल रुसला की काय? जितेंद्र जोशीला पडला प्रश्न - jitendra...

आषाढी एकादशी: विठ्ठल रुसला की काय? जितेंद्र जोशीला पडला प्रश्न – jitendra joshi special video on ashadhi ekadashi vitthal darshan


मुंबई- मराठी वर्षातील आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी सुरू असल्याचे मानले जाते.

आषाढी एकादशी म्हटले की, प्रथम डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी. वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीलाही अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, अशी मान्यता आहे. पंढरपूरच्या वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी थोडीच आहे. वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते.

काही विलक्षण अनुभवायचं असेल तर एक तरी वारी कराच

विठ्ठल भक्तांचा श्वास आणि ध्यास असणारी पंढरीची पायी वारी कोरोनामुळे यावर्षी थांबवावी लागली. विठ्ठला, जीवात जीव असेपर्यंत दरवर्षी पायी वारी करत तुझ्या दर्शनाला येईन असा विठ्ठलाला शब्द दिलेल्या वारकऱ्यांच्या काळजाचा जणू ठोकाच चुकला. या आषाढीला चंद्रभागेच्या तीरी झेंडा पताका फडकणार नाहीत, हरिनामाचा जयघोष होणार नाही, रिंगण होणार नाही, वारकऱ्यांना विठू माऊलीचं दर्शन घेता येणार नाही. याची देही याची डोळा विठ्ठलरूप मनात साठवता येणार नाही.

धांवोनियां आलो पहावया मुख | गेले माझे दुःख जन्मांतरिंचे ||
ऐकिले ही होते तैसे चि पाहिले| मन स्थिरावले तुझ्या पायी||

तासनतास दर्शन रांगेत उभं राहून माऊलीचं दर्शन घेऊन मुक्ती अनुभवणारे आपले वारकरी. यावर्षी मात्र विठ्ठलाच्या वारकऱ्यांसाठीची आनंदाची पर्वणी अर्थात वारी आळंदीहून निघाली नाही.

…कारण, शेती विकायची नाही तर राखायची असते!

विठ्ठल भेटीची आस लागलेल्या तमाम विठ्ठल भक्तांसाठी काही करता येईल का असा विचार सचिन सुर्यवंशीने केला. याच विचारातून आषाढी एकादशी दिवशी लाखो वारकऱ्यांसाठी सचिन बाळासाहेब सुर्यवंशीचं लिखाण असलेलं विठ्ठलाचं एक आगळंवेगळं ‘दर्शन’ घडवलं. याला साथ दिली ती अभिनेता जितेंद्र जोशी ने. त्याच्या सादरीकरणातून कोल्हापूर फिल्म कंपनीने विठ्ठलाचं आगळं वेगळं दर्शन वाकऱ्यांसाठी आणलं.

‘दर्शन’ ही कोल्हापूर फिल्म कंपनीच्या सचिन सुरेश गुरव यांची निर्मित, संकल्पना असून संकलन फैजल महाडिक यांनी केले आहे, पार्श्वसंगीत अमित पाध्ये यांनी दिले असून प्रथमेश रांगोळे यांच्या छायाचित्रणातून हे दर्शन आपल्याला घेता येणार आहे. असं हे विठ्ठलाचं आगळंवेगळं ‘दर्शन’, सेवेच्या रुपात कोल्हापूर फिल्म कंपनीने विठ्ठल भक्तांचरणी रुजू केली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

dr. vijayalakshmi ramanan: इतिहासाची पाऊलखूण : डॉ. विजयालक्ष्मी रामनन – tribute to india’s first woman doctor later wing commander of iaf, vijayalakshmi ramanan

वयाच्या ९६व्या वर्षी शांतपणे जगाचा निरोप घेतलेल्या देशाच्या पहिल्या महिला हवाई अधिकारी डॉ. विजयालक्ष्मी रामनन (vijayalakshmi ramanan )यांनी प्रदीर्घ कालखंड अनुभवला.  Source link

degree exam cet clash: सीईटी परीक्षार्थींसाठी ‘आयडॉल’ची स्वतंत्र परीक्षा – final year exam cet clash, idol’s separate test for cet candidates

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई सीईटी परीक्षा आणि 'आयडॉल'ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित...

Oppo A33 (2020): ओप्पोचा जबरदस्त स्मार्टफोन Oppo A33 भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स – oppo a33 (2020) with triple rear cameras, 5,000mah battery launched in...

नवी दिल्लीः ओप्पोने भारतात आणखी एक जबरदस्त स्मार्टफोन Oppo A33 भारतात लाँच केला आहे. ज्यात ४ कॅमेरे आहे. तसेच 5000 mAh बॅटरी दिली...

Recent Comments