Home देश इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन: अंतराळ मोहिमांत खासगी क्षेत्राला परवानगी, इस्रोची घोषणा -...

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन: अंतराळ मोहिमांत खासगी क्षेत्राला परवानगी, इस्रोची घोषणा – opening space sector will enable india to play important role in global space economy: isro chief


नवी दिल्ली : खासगी कंपन्यांना अंतराळ क्षेत्रात दिली गेलेली परवानगी भारतासाठी फायदेशीर ठरेल, असं मत ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’चे (ISRO) प्रमुख के सिवन यांनी व्यक्त केलंय. आता खासगी क्षेत्रालाही अंतराळात रॉकेट, उपग्रह निर्माण आणि प्रक्षेपण सेवा देण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. यासोबतच खासगी क्षेत्र भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आंतरग्रहीय मिशनमध्ये सहभागी होऊ शकतात.

खाजगी उद्योगांसाठी अवकाश क्षेत्र उघडणं हे अवकाश तंत्रज्ञानाचे फायदे वाढविण्यास आणि भारतीय उद्योगांना जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी सक्षम करू शकेल, असंही के सिवन यांनी म्हटलंय.

वाचा :चीनने S-400 मिसाईल तैनात केल्यास भारताकडे पर्याय काय?
वाचा :क्षेपणास्त्र, दारुगोळा लवकर पाठवा; भारताची रशियाला विनंती

उल्लेखनीय म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी ग्रहांच्या शोधासहीत अंतराळातील इतर मोहिमांमध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागाला मंजुरी दिलीय. त्यामुळे रॉकेट बनवण्यासाठी आणि लॉन्चिंग करण्यासाठी उत्सुक खासगी कंपन्यांसाठी आता भारतीय अंतराळ संस्थेचे दरवाजे खुले झालेत. तसंच इस्रोच्या मोहिमांतदेखील खासगी कंपन्या सहभागी होऊ शकतात. इस्रो आपल्या मोहिमेत घट करणार नसल्याचं के सिवन यांनी स्पष्ट केलं. इस्रोच्या आंतर ग्रह आणि मानवनिर्मित अंतराळ उड्डाण मोहिमांसह प्रगत संशोधन आणि विकास सुरू राहील, असंही त्यांनी म्हटलंय.

अंतराळ क्षेत्रात खासगी कंपन्यांना सहभागी करून घेण्याची परवानगी देण्यासाठी आणि त्यासंबंधित संबंधात स्वतंत्र निर्णय घेण्याकरिता एक स्वायत्त नोडल एजन्सी स्थापित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलीय. या एजन्सीचं नामकरण ‘भारतीय राष्ट्रीय अंतराळ, संवर्धन आणि प्राधिकरण केंद्र’ असं करण्यात आलंय. अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी एक राष्ट्रीय नोडल एजन्सी म्हणून ती काम करेल. यासाठी इस्रो आपल्या तांत्रिक तज्ज्ञांसोबत वेगवेगळ्या सुविधाही खासगी क्षेत्रापर्यंत पोहचवणार आहे, असंही के सिवन यांनी स्पष्ट केलं.

खासगी कंपन्या गेल्या अनेक वर्षांपासून इस्रोला वस्तुंचा पुरवठा करण्याचं काम करत आहेत. आता थेट अंतराळ मोहिमांत सहभागी झाल्यानं अंतराळ संशोधन क्षेत्रात नोकरीच्या संधीतही वाढ होईल. या व्यतिरिक्त या क्षेत्रात आणखीन चांगली वाढ होण्याची शक्यता आहे, अशी आशाही सिवम यांनी व्यक्त केली. अमेरिका, चीन आणि युरोपच्या बऱ्याच देशांमध्ये अगोदरपासूनच अंतराळ संशोधन क्षेत्रात खासगी क्षेत्राचाही समावेश करण्यात आलाय.

वाचा :भारत-चीन वाद: चीनने आपले काही सैनिक मागे हटवले, वाहनेही घेतली मागे
वाचा :राजीव गांधी फाउंडेशनला चीनचा पैसा, भाजपचा सनसनाटी आरोपSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shaheen afridi: ‘या’ गोलंदाजाने भारताच्या जसप्रीत बुमराहचा विक्रम मागे टाकला – pakistan shaheen afridi became quickest 100 wickets in t20

नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह(jasprit bumrah)चा टी-२० मधील विक्रम पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने मागे टाकलाय. २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहीन...

Recent Comments