Home शहरं औरंगाबाद इंधन दरवाढीमुळे घोड्याद्वारे शेतकाम

इंधन दरवाढीमुळे घोड्याद्वारे शेतकाम


म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

सातत्याने होत असलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे खुलताबाद तालुक्यातील वेरूळ शिवारातील एका शेतकऱ्याने त्यावर उपाय शोधला आहे. शेख अलीम शेख सिकंदर यांनी घोडा खरेदी केला असून ते घोड्याच्या साह्याने शेतीची कामे करत आहेत.

शेख अलीम यांना तीन एकर शेती असून या खरीप हंगामात त्यांनी मका पेरला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून शेख अलीम शेख सिकंदर यांनी घोडा विकत घेतला आहे. त्यांच्याकडे बैल नसल्याने भाड्याने घेऊन ट्रॅक्टरने शेतीकामे करण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने या महागाईला कंटाळून त्यांनी घोडा विकत घेतला. सध्या खरीप हंगामात या घोड्यावर शेतातील मशागत, कोळपणी आदी कामे करत आहेत.

त्यामुळे ‘घोड्यावरून शेती’ करणारे म्हणून शेख अलीम शेख सिकंदर हे वेरूळमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. शेती व्यतिरिक्त फिरण्यासाठी देखील घोडा वापरतात. नातेवाईकांकडे लग्नसमारंभ तसेच अन्य कार्यक्रमांनाही घोड्यावर स्वार होऊनच जातात. त्यांची हे २१ व्या शतकातील आगळेवेगळे वाहन सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. महागाईवर उपाय म्हणून त्यांनी लढवलेली शक्कल कौतुकाचा विषय ठरत आहे ‘शेतकऱ्यांकडे बैलजोडी नसल्यास घोड्याचा वापर करता येतो. यामुळे घोडे पालनाचा वेगळा पूरक व्यवसाय शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतो,’ असे शेख अलीम शेख सिकंदर यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Road Accidents in India: हा तर निव्वळ आत्मघात – road accidents after lockdown in india

करोनामुळे देशभरात वाहतूक मंदावली होती आणि त्यामुळे अपघात व अपघाती मृत्यूंची संख्याही कमी झाली होती. मात्र, आता टाळेबंदी संपल्यानंतर पुन्हा रस्तेअपघातांचे प्रमाण करोनापूर्व...

Recent Comments