Home देश पैसा पैसा इंधन दर स्थिर ; हा आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

इंधन दर स्थिर ; हा आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भावमुंबई : इंडियन ऑइलच्या दर पत्रकानुसार बुधवारी मुंबईसह इतर प्रमुख शहरांत इंधन दरात कोणताही बदल झाला नाही. मुंबईत पेट्रोलचा दर प्रती लीटर ७८.३२ रुपये झाला असून डिझेल दर ६८.२१ रुपये आहे. दिल्लीत आज पेट्रोलचा भाव ७१.२६ रुपये आहे. डिझेलच्या दरात देखील कोणताही बदल झालेला नाही. डिझेलचा भाव ६९.३९ रुपये आहे.चेन्नईत पेट्रोल दर ७५.५४ रुपये असून डिझेल ६८.२२ रुपये आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोल दर प्रती लीटर ७३.९७ रुपये असून डिझेल ६७.८२ रुपये आहे.

राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करावर (VAT) अधिभार वाढवल्याने सोमवारपासून राज्यात पेट्रोल आणि डिझेल प्रती लीटर दोन रुपयांनी महागले आहे. याआधी मार्च महिन्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर एक रुपया अतिरिक्त अधिभार लावला होता.

दरम्यान, जवळपास महिनाभरापासून जागतिक बाजारातील महागाईचा भर सोसणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी आता दैनंदिन दर आढावा प्रणाली सुरु करण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागितली आहे. ही परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींशी सुसंगत करावे लागतील. ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल किमान ४ ते ५ रुपयांनी महागण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Corona Cases in Aurangabad: एका रुग्णाचा मृत्यू; १११ नवे बाधित – aurangabad reported 111 new corona cases and 1 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील पाथरी येथील ७० वर्षांच्या बाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बळींची संख्या...

Maradona Goals Every Football Fans Should Watch His Skills And Abilities – Maradona Goals Video: प्रत्येक चाहत्याने पाहिले पाहिजेत मॅराडोनाच्या सर्वोत्तम गोलचे व्हिडिओ

नवी दिल्ली: फुटबॉल जगातील महान खेळाडू दिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांचे बुधवारी निधन झाले. फुटबॉल जगतातील सर्व चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या मॅराडोनाच्या निधनामुळे...

suvrat joshi startup: अभिनेता सुव्रत जोशीच्या मदतीनं सुरु होतंय नवीन ‘पर्व’ – marathi actor suvrat joshi is part of new startup called parva

मुंबई: अभिनेता सुव्रत जोशी काही दिवसांपूर्वीच लंडनहून परताय. त्यानं त्याच्या आगामी चित्रपटासाठी डबिंगचं कामही सुरू केलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का सुव्रत...

ITI admissions 2020: ‘आयटीआय’चे सुधारित वेळापत्रक जाहीर; ‘एसईबीसी’आरक्षण वगळून प्रवेश – iti admissions 2020 revised schedule announced

म. टा. प्रतिनिधी, पुणेऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 'एसईबीसी' आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या आदेशानंतर बुधवारी व्यवसाय शिक्षण व...

Recent Comments