Home मनोरंजन इरफान खान: पाकिस्तानी अभिनेत्याने मागितली इरफान- श्रीदेवीच्या कुटुंबियांची माफी - pakistani actor...

इरफान खान: पाकिस्तानी अभिनेत्याने मागितली इरफान- श्रीदेवीच्या कुटुंबियांची माफी – pakistani actor adnan siddiqui apologises to irrfan khan and sridevi families


मुंबई- पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दीकीने बॉलिवूड कलाकार श्रीदेवी आणि इरफान खान या दोन्ही कलाकारांसोबत काम केलं. नुकत्याच एका पाकिस्तानी शोमध्ये ते गेले होते. शोचा अँकर आमिर लियाकतने त्याला श्रीदेवी आणि इरफान खान यांच्या निधनाबद्दल प्रश्न विचारले. या गप्पांवेळी अँकरे असंवेदनशील वक्तव्य केलं. त्याचं हे वक्तव्य अदनान सिद्दीकीला मात्र फारसं आवडलं नव्हतं. याबद्दलच त्याने सोशल मीडियावर श्रीदेवी आणि इरफान खान यांच्या कुटुंबियांची माफी मागितली.

अदनानने ट्विटरवर शेअर केलं की, ‘अँकर आमिर लियाकतने संवेदनशील गोष्टींची चेष्टा केली. त्या दोघांसोबतचं माझं नातं चांगलं होतं म्हणून नाही पण माणुसकीच्या दृष्टीनेही अँकरची ही चेष्टा चुकीची होती. निधन झालेल्या लोकांबद्दल अशापद्धतीने मस्करी करणं पूर्णपणे चुकीचं आहे. अँकरचं असं करणं फक्त त्याचं व्यक्तिमत्त्व दाखवत नाही तर माझी आणि माझ्या देशाची प्रतिमाही खराब होते.’

मला माफ करा-

अदनान सिद्दीकीने लिहिले की, ‘मी श्रीदेवी आणि इरफान खान यांच्या कुटुंबियांची, जवळील लोकांची आणि चाहत्यांची क्षमा मागतो. जर तुम्ही त्या संभाषणात माझे हावभाव पाहिले तर तुम्हाला कळेल की मलाही ती गोष्ट फार आवडली नव्हती. पण तेव्हा मी अँकरप्रमाणे स्वतःच्या नजरेत पडू इच्छित नव्हतो. मला त्या कार्यक्रमात जाण्याबद्दल खेद आहे. मी यातून शिकलो आणि आश्वासन देतो की, भविष्यात मी अशी कोणतीही गोष्ट सहन करणार नाही. मला वाटलं होतं की हे व्हायरल होणार नाही. पण दुर्दैवाने झालं. मला माफ करा.’

२० एप्रिलला झालं इरफान खान यांचं निधन

२९ एप्रिलला मुंबईत इरफान खान यांचं निधन झालं. कोलन इन्फेक्शनवर कोकिलाबेन इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तर २४ फेब्रुवारी २०१८ मध्ये श्रीदेवी यांचं निधन झालं होतं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nashik News : ‘ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा’ – caste based obc census should be conducted

म. टा. वृत्तसेवा, कळवणमराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये. त्यामुळे राज्यातील संपूर्ण ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात...

Shirdi Saibaba Temple: Saibaba Temple: साईचरणी ९ दिवसांत कोट्यवधींचे दान; सहा देशांचे चलनही तिजोरीत! – saibaba temple gets rs 3 crore donations in 9...

नगर: राज्य सरकारच्या आदेशाने शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्या पासून (१६ नोव्हेंबर) ते काल, मंगळवारपर्यंत सुमारे ४८ हजार...

aurangabad News : वीज बिल फाडून मनसेचे आंदोलन – mns agitation by tearing up electricity bill

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादवाढीव वीज बिलाबाबत महावितरण विभागाकडून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी काही उपाय योजना केली जात नाहीत, असा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Recent Comments