Home मनोरंजन इरफान खान: व्हिडिओ- अनोख्या पद्धतीने मिथिला पालकरने इरफानला वाहिली श्रद्धांजली - mithila...

इरफान खान: व्हिडिओ- अनोख्या पद्धतीने मिथिला पालकरने इरफानला वाहिली श्रद्धांजली – mithila palkar tribute to irrfan khan with her karwaan song


मुंबई- बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान यांचं २९ एप्रिल रोजी निधन झालं. कोकिलाबेन इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री मिथिला पालकरने त्यांना खास अंदाजात आदरांजली वाहिली.

सलमान खानने गरजूंना बैलगाडीतून पाठवलं धान्य

मिथिला पालकर, इरफान खान आणि अभिनेता दुलकर सलमान यांनी ‘कारवां’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात तिघांच्याही अभिनयाचं कौतुक झालं होतं. मिथिलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. यात तिने ‘कारवां’ सिनेमातील ‘हार्टक्वेक’ गाणं गाऊन इरफान खान यांना श्रद्धांजली वाहिली.

असं वाटलं मी माझं चौथं मुल गमावलं- आशा भोसले

या व्हिडिओसह मिथिलाने इरफानसाठी सुंदर मेसेजही लिहिला. ‘हे शौकत #SingSongSaturday तुझ्यासाठी आहे. नेहमीप्रमाणे मी गाणं आणि स्ट्रमिंगमध्ये अडखळत आहे. पण तरीही शिकण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून माझअया बिनाका गीतमालेतून मी तुम्हाला शेवटचा त्रास देऊ शकीन. जिथे असाल तिथे आनंदी रहा. खुदा हाफिज.. प्रेम.. तान्या..’


‘कारवां’ सिनेमात इरफान खानच्या व्यक्तिरेखेचं नाव शौकत होतं, तर मिथिलाने तान्या नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. अक्षरा खुराना यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. श्रद्धांजली वाहण्याच्या मिथिलाच्या या अनोख्या अंदाजावर अनेक युझर्सने प्रतिक्रियाही दिली.

माझ्या प्रत्येक निर्णयाला बाबांचं समर्थन असायचं- बाबिल

२०१८ मध्ये इरफान खान यांना न्यूरो एण्डोक्राइन ट्यूमर झाल्याचे समोर आलं होतं. यानंतर उपचारांसाठी ते वर्षभर लंडनला गेला होता. भारतात परतल्यानंतर त्यांनी ‘अंग्रेजी मीडियम’ सिनेमात काम केलं. २८ एप्रिल रोजी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तातडीने कोकिलाबेन इस्पितळात भरती करण्यात आलं. इथेच त्यांनी २९ एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

दुहीच्या बंदुका

राजकारणाचा स्तर किती खालावत चालला आहे, याची प्रचीती सध्या दर दिवसागणिक येते. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वैधानिक विकास मंडळांच्या नियुक्त्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी...

Arnab Goswami: हक्कभंग समितीचे अर्णब गोस्वामींना समन्स; ‘हे’ आहे कारण – legislative assembly violation committee sommones to arnab goswami

टीआरपी घोटाळ्याच्या चौकशीत अडचणीत आलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना विधानसभेच्या हक्कभंग समितीने समन्स बजावले आहे.  Source link

Recent Comments