Home ताज्या बातम्या उद्धव ठाकरेंच्या नजरेतील आषाढी वारीची एक आठवण, खास VIDEO तून 'पहावा विठ्ठल!'...

उद्धव ठाकरेंच्या नजरेतील आषाढी वारीची एक आठवण, खास VIDEO तून ‘पहावा विठ्ठल!’ | News


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनात ‘पहावा विठ्ठल’ या त्यांनी चित्रण केलेल्या फोटो आणि व्हिडिओचा उल्लेख केला. तोच व्हिडीओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे.

मुंबई, 28 जून: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. महाराष्ट्राला आषाढी एकादशीला वारीची परंपरा आहे. आषाढी वारी आली आहे आणि मी पंढरपुरला चाललो आहे. विठूरायाला कोरोनाचं संकट संपवण्यासाठी आणि आरोग्यदायी आयुष्य मागण्यासाठी साकडं घालणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्री या नात्याने नाही, तर तुमचा, वारकरी बांधवांचा प्रतिनिधी म्हणून पंढरपूरला जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा…BMC मध्ये महिला राज! इतिहासात पहिल्यांदा संचालकपदी महिलेची नियुक्ती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनात ‘पहावा विठ्ठल’ या त्यांनी चित्रण केलेल्या फोटो आणि व्हिडिओचा उल्लेख केला. तोच व्हिडीओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे.

वारकऱ्यांच्या रुपातच पाहिलं विठ्ठलाचं विश्वरुप…

आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. आषाढी वारीला सुमारे 1800 वर्षांची परंपरा आहे. दरम्यान, 2010 मध्ये त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं होतं. मात्र, ते प्रत्यक्ष वारी सहभागी झाले नव्हते. वारकऱ्यांच्या रुपातच विठ्ठलाचं विश्वरुप पाहिल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी हेलिकॉप्टरमधून एरिअल फोटोग्राफी केली होती. त्याचं पुढे ‘पहावा विठ्ठल’ हे पुस्तक आलं. आता व्हिडीओ रिलिज करण्यात आला असून ‘विठ्ठल विठ्ठल…पहावा विठ्ठल’ हे गाण्याला प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी स्वरबद्ध केलं आहे.

विठू रायाला साकडं घालणार…

राज्यात काय परिस्थिती निर्माण झाले आहे. लाखो वारकरी आज घरात अडकले आहे. अनेक चित्रपटातून तुझे चमत्कार आम्ही पाहिले आहे. राज्यावरील कोरोना संकट दूर करण्यासाठी विठ्ठलाला साकडं घालणार आहे. तुम्ही सगळे माझ्यासाठी पाठीशी उभे राहावे. मुख्यमंत्री म्हणून मान वेगळा आहे पण मी मुख्यमंत्री म्हणून नाहीतर तुमचा प्रतिनिधी म्हणून जात आहे. आपल्या विठूरायाला साकडं घालणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा..जुळ्या झाल्या, सांभाळायच्या कशा? या विवंचनेतून आईनंच पाण्याच्या टाकीत बुडवलं

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या घोषणेमुळे विरोधकांची बोलती बंद झाली आहे. आषाढी एकादशीला उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक पंढरपूरला जाऊ नये, विठ्ठलाची महापूजा करू नये, असं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं.

First Published: Jun 28, 2020 08:57 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येला गंभीर वळण; ठाण्यातील ‘तो’ नगरसेवक कोण? – jameel shaikh death complaint against thane corporator

महेश गायकवाड । ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांचे मारेकरी २४ तासानंतरही सापडलेले नसून मारेकऱ्यांना अटक करण्याचे पोलिसांचे युद्धपातळीवर...

Recent Comments