एकीकडे यामुळे सुरक्षा दलाचं कौतुक केलं जातंय तर दुसरीकडे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मात्र हे एक ‘प्रचाराचं टूल’ असल्याचं म्हटलंय.
‘या फोटोंतून भारतीय सेनेला हे सिद्ध करायचं की आम्ही चांगले आहोत आणि ते वाईट आहेत’ असं म्हणतानाच हा फोटो सोशल मीडियावर न शेअर करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.
वाचा :स्वतःच्या देशाविरोधात बाजू मांडणार नाही; मुकुल रोहतगींचा टिकटॉकला नकार
वाचा :आत्मनिर्भर भारत; रेल्वेचे रुळही आता भारतातच तयार
‘काश्मीरमधील खुनी संघर्षात प्रत्येक गोष्ट प्रोपोगंडा टूल बनते. एका तीन वर्षांच्या मुलाचं दु:ख सगळ्या जगभरात प्रसारीत केलं जातं. त्यातून हा संदेश दिला जातो की आम्ही चांगले आहोत आणि ते वाईट. आपण त्याचं दु:ख कॅमेऱ्यात कैद न करताही त्यांची पीडा समजू शकतो. त्यामुळे कृपया हे फोटो शेअर करू नये’, असं आवाहन उमर अब्दुल्ला यांनी केलंय.
एका चकमकीदरम्यान सापडलेल्या तीन वर्षांच्या मुलाला रेस्क्यू करण्याहून कमी आपण वर्दीतल्या जवानांकडून अपेक्षा करू शकत नाहीत. यासाठी आपण त्यांचे कृतज्ञ नक्कीच आहोत परंतु, असे फोटो काढणे आणि तीन वर्षांच्या मुलाचं दु:खाचं प्रदर्शन मांडणं, जसं की आज होतंय, याहून चांगल्या गोष्टींची नक्कीच आशा करू शकतो, असंही त्यांनी म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका टीमवर जाळं रचून हल्ला केला. दोन्ही बाजुंनी सुरू असलेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. तसंच या चकमकीदरम्यान दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात या चिमुकल्याचे आजोबाही ठार झाले. घटनेच्या वेळी त्यांच्यासोबत हा चिमुकलाही आपल्या आजोबांसोबत होता.
आजोबांना गोळी लागल्याचं पाहून हा मुलगा त्यांच्याजवळ बसून रडताना सीआरपीएफच्या जवानांनी पाहिलं. एका जवानानं या चिमुकल्याला आपल्याकडे बोलावून घेतलं. त्यानंतर या जवानानं चिमुकल्याला सुरक्षित स्थळी हलवलं. रडणाऱ्या या मुलाला शांत करण्याचे आणि त्याला त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचवण्याचे प्रयत्नही सीआरपीएफच्या जवानांनी केले.
वाचा :काश्मीर: सीआरपीएफ गस्ती पथकावर मोठा दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद
वाचा :आजोबांच्या मृतदेहावर बसला चिमुकला; दहशतवादाचा सर्वात तिरस्करणीय चेहरा