Home ताज्या बातम्या एकनाथ खडसेंची ताकद, मुक्ताईनगरमध्ये भाजप कार्यालय उघडण्यासाठीही कार्यकर्ता मिळाला नाही! eknath khadse...

एकनाथ खडसेंची ताकद, मुक्ताईनगरमध्ये भाजप कार्यालय उघडण्यासाठीही कार्यकर्ता मिळाला नाही! eknath khadse impact There is no party worker left to open BJP office in Muktainagar mhas | News


मुक्‍ताईनगर येथील भाजप कार्यलयाला लागलेल्या कुलूपावरून तालुक्यात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

जळगाव, 24 ऑक्टोबर : अगदी सकाळपासून कार्यकर्त्यांची वरदळ असलेले मुक्ताईनगरमधील भाजप कार्यालय आज अगदी सुनेसुने पाहण्यास मिळत आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर मुक्ताईनगरमध्ये भाजपला उतरती कळा लागणार असल्याचा दावा करण्यात येत होता. अशातच मुक्‍ताईनगर येथील भाजप कार्यलयाला लागलेल्या कुलूपावरून तालुक्यात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

मुक्ताईनगरमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून नाराज खडसे यांच्या पक्षांतराबाबत बोललं जात होतं. त्यातच 23 ऑक्टोबर रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मुक्ताईनगरमधील भाजपचे काय होईल? याबाबत चर्चा रंगत असताना मुक्ताईनगर शहरातील भाजपचं अस्तित्व कमी झाल्याचे मोठे उदाहरण पाहण्यास मिळत आहे. दररोज सकाळपासून वर्दळ असलेल्या मुक्ताईनगर शहरातील भाजप कार्यालयाला लागलेले कुलूप सर्व बोलून जाते.

कार्यालयात कोणी आलेच नाही!

मुक्ताईनगर मतदारसंघात खडसे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. भाजपने खडसे यांच्यावर आरोप केला, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपला सोडचिठ्ठी दिली. यामुळे मुक्ताईनगर शहरात भाजप कार्यालय उघडण्यासाठी सुद्धा भाजपचा कार्यकर्ता उरला नसल्याचं चित्र आहे.


Published by:
Akshay Shitole


First published:
October 24, 2020, 5:15 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Maharashtra govt employees strike: Maharashtra Strike: संपाआधीच ठाकरे सरकारचा इशारा; ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर होणार मोठी कारवाई – will take action against employees if they go...

मुंबई: राज्य शासकीय कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात उद्या (गुरुवारी) संपावर जात आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी तशी नोटीस शासनाला दिली आहे. त्या...

aurangabad News : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना घरीच मतदानाची सोय – senior citizens, disabled people can vote at home

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना 'मोबाइल पोलिंग बुथ'च्या माध्यमातून त्यांच्या घरीच गोपनीय पद्धतीने मतदान करण्याची सुविधा...

sourav ganguly: India vs Australia : रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांच्यापैकी कोणाला संधी मिळायला हवी, सौरव गांगुली म्हणाले – rishabh pant and wridhiman...

सिडनी, india tour of australia 2020 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासन सुरुवात होणार आहे. पण भारताच्या संभाव्य संघात रिषभ पंत...

Recent Comments