Home ताज्या बातम्या 'एक मूल कुशीत घट्ट धरलेलं असतानाच मला कळलं, मी दुसरं गमावलंय'... ब्रिटनच्या...

‘एक मूल कुशीत घट्ट धरलेलं असतानाच मला कळलं, मी दुसरं गमावलंय’… ब्रिटनच्या राजघराण्यातलं दुःख प्रथमच झालं उघड | News


न्यूयॉर्क, 25 नोव्हेंबर : ब्रिटनच्या राजघराण्यात खूप मोजून मापून व्यक्त व्हायची पद्धत आहे. पण या राजघराण्यातली सगळ्यात नवी सुनेनं पहिल्यांदाच जाहीरपणे आपल्या दुःखाला मोकळी वाट करून दिली आहे. राजपुत्र हॅरीची (Prince Harry) पत्नी – डचेस ऑफ ससेक्स ( THE DUCHESS OF SUSSEX) मेगन मर्केल (Meghan Markle) हिने मूल गमावल्यानं झालेलं दुःख एका भावनिक लेखाद्वारे व्यक्त केलं आहे. न्यूयॉर्क टाइम्स मध्ये मेघनचा लेख प्रसिद्ध झाला आहे. जुलैमध्ये गर्भपात (miscarriage) झाल्यामुळे मेगननं आपलं बाळ गमावलं, त्याबद्दल तिने The Losses We Share नावाने लेख लिहिला आहे.

‘हे दुःख सहन करणं अगदी अशक्यप्राय असल्याचं तिनं द न्यूयॉर्क टाईम्समध्ये लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘द लॉसेस वी शेअर’ नावाने लिहिलेल्या या पोस्टमध्ये तिने आपली मनोव्यथा मांडली आहे. ‘जुलै महिन्यातील त्या दिवशी पहाटे ती माझा मुलगा आर्ची याचं डायपर बदलत असताना अचानक पोटात तीव्र क्रॅम्प जाणवला. आर्चीला आपल्या हातात घेऊन मी जमिनीवर आडवी झाली आणि स्वतःला आणि त्यालाही शांत करण्यासाठी अंगाई गुणगुणू लागले; पण काहीतरी चुकलंय, काही तरी भयंकर घडतंय याची जाणीव तेव्हा होत होती’, मेघनने लिहिलं आहे.

‘मी माझ्या पहिल्या बाळाला हातात धरलं होतं पण त्याचवेळी कदाचित मी माझं दुसरं बाळ गमावतेय याची जाणीव मला होत होती. काही तासानंतर मी हॉस्पिटलच्या बेडवर होते. माझ्या नवऱ्याचा हात माझ्या हातांत होता. त्याच्या स्पर्शातून मला त्याची तळमळ कळत होती. आमच्या दोघांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी त्याची बोटं भिजली होती, त्यांना मी कीस केलं. आम्ही या दुःखाचा सामना कसा करणार आहोत, याची कल्पना करण्याचा प्रयत्न मी करू लागले,’ असं मेगननं म्हटलं आहे.

बाळ गमावल्यानं झालेल्या दुःखाबद्दल लिहिताना तिने प्रिन्स हॅरीसोबतच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील आठवणीचा उल्लेख केला आहे. एका पत्रकाराने तिला प्रश्न केला होता, ‘आर यू ओके?’  खूप साधा प्रश्न होता, पण तिच्यासाठी तो खूप महत्त्वाचा होता, कारण तोपर्यंत ती कशी आहे, हे कोणी विचारलंच नव्हतं. त्यावर तिनं जे उत्तर दिलं त्याचे पडसाद जगभरात उमटले.

मूल गमावण्याचं दुःख काय असतं, यावरही ती खुलेपणानं व्यक्त झाली आहे. ‘हे दुःख असह्य आहे, अनेकजणी या दुःखातून जातात; पण फार थोडेजण याविषयी बोलतात, असं मेगनने म्हटलं आहे. आमच्या या दुःखद अनुभवातून माझ्या आणि हॅरीच्या असं लक्षात आलं की, एखाद्या खोलीत 100 महिला असतील तर त्यातील 10 ते 20 महिलांनी गर्भपाताचं दुःख सहन केलेले असतं. अर्थात हा अनुभव सार्वत्रिक असला तरी त्याबद्दल बोलण्याचे टाळलं जातं. लाज बाळगली जाते. एकांतातच याबद्दल दुःख केलं जातं’, असंही मेगनने लिहिले आहे.

ब्रिटनच्या या युवराज्ञीने लिहिलं आहे की, ‘आता आम्ही न्यू नॉर्मल परिस्थितीशी जुळवून घेत आहोत. शारीरिकदृष्ट्या आम्ही लांब असलो तरी मनाने आणखी जवळ आलो आहोत. दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत आहोत. हॉस्पिटलमधील बेडवर बसून माझ्या नवऱ्याकडे बघताना, मला तो स्वतःचे दुःख बाजूला ठेवून मला सावरायचा प्रयत्न करतोय हे दिसत होते. त्यावेळी मला जाणीव झाली की, दुःख कमी करण्याची सुरुवात आपण ‘आर यू ओके? हा साधासा वाटणारा तरीही फार मोलाचा प्रश्न विचारून करू शकतो.’

मेगन मर्केल ही ब्रिटीश राजघराण्यातली सगळ्यात बंडखोर व्यक्ती समजली जात आहे. प्रिन्स हॅरीने घटस्फोटिता


Published by:
अरुंधती रानडे जोशी


First published:
November 25, 2020, 10:44 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bcci: IND vs AUS : भारतीय संघाला बीसीसीआयने दिला भरगच्च बोनस, खेळाडू होणार मालामाल – ind vs aus : bcci has announced 5 crore...

ब्रिस्बेन, IND vs AUS : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचला. भारतीय संघाने बोर्डर-गावस्कर ट्राॉफीमध्ये विजयाची हॅट्रीक नोंदवली, त्याचबरोबर ब्रिस्बेनच्या मैदानात भारतीय संघाना...

redmi k40 battery performance: रेडमीचा ‘हा’ स्मार्टफोन ३७ तासांपर्यंत चालणार, लाँचआधी कंपनीचा दावा – redmi k40 battery performance and key details teased by company,...

नवी दिल्लीः रेडमीच्या Redmi K40 या स्मार्टफोनची लाँचिंग आधीच जोरदार चर्चा सुरू आहे. रेडमीचे जनरल मॅनेजर ल्यू विबिंग यांनी या फोनच्या बॅटरीसंबंधी एक...

pakistan gold mine news: Pakistan Gold सोन्याच्या खाणीचा ताबा महागात पडला; पाकिस्तानला ६ अब्ज डॉलरचा दंड – how pakistan lost 6 billion dollar on...

इस्लामाबाद: आधीच आर्थिक संकटाच्या फेऱ्यात अडकलेल्या पाकिस्तानला ब्रिटिश व्हर्जिन बेट समूहाच्या एका कोर्टाने मोठा झटका दिला आहे. कोर्टाने पाकिस्तानला सहा अब्ज डॉलरचा दंड...

Recent Comments