Home मुंबई नवी मुंबई एपीएमसीत ज्येष्ठांना प्रवेशबंदी!

एपीएमसीत ज्येष्ठांना प्रवेशबंदी!करोनाचा धोका लक्षात घेऊन मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्यांबाबत निर्णय

म. टा. वृत्तससेवा, नवी मुंबई

ज्येष्ठ नागरिकांना करोनाची लागण होण्याचा धोका लक्षात घेऊन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने ५५ वर्षांवरील मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि बाजार समितीमधील इतर घटकांना बाजारात येण्यास मनाई केली आहे. तशा सूचना बाजार आवारातील व्यापारी संघटनांना केल्या आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध बाजार आवारात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र तरी करोनाचा संसर्ग थांबलेला नाही. रुग्णांची संख्या वाढतच आहे. यामध्ये ५५ वर्षांवरील मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांना लवकर संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना बाजार आवारात येण्यापासून थांबवणे गरजेचे आहे, असे मत बाजार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आले. त्यामुळे सर्व व्यापारी संघटनांनी त्यांच्या सदस्यांना याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन बाजार समिती सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले आहे. बाजारात अशा व्यापाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के आहे. त्यामुळे या सूचनेची अंमलबजावणी सुरू झाल्यावर बाजारातील व्यापाऱ्यांची संख्या आणखी घटणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kangana Ranaut: वाईटावर चांगल्याचा विजय; कंगनानं पुन्हा राऊतांना डिवचलं – kangana ranaut attacks on cm uddhav thackeray, sanjay raut

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळं चर्चेत असते. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या कंगानानं पुन्हा एकदा संजय...

Kalyan Kale: ‘देवगिरी’त बागडेंनी आडवे येऊ नये – former mla dr. kalyan kale warns to mla haribhau bagde over devgiri cooperative sugar factory

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री'देवगिरी कारखान्यावर प्रशासकीय मंडळ येणारच. कारखाना सुरू होणार यात शंका नाही. मात्र, या कामात आमदार हरिभाऊ बागडेंनी आडवे येऊ नये,'...

Recent Comments