Home शहरं मुंबई एसटीची स्वेच्छानिवृत्ती अधांतरी

एसटीची स्वेच्छानिवृत्ती अधांतरी


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

खर्चात कपात करण्यासाठी घोषित केलेल्या एसटी महामंडळाच्या योजनेला निधीची प्रतीक्षा कायम आहे. निवृत्तीनंतर देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभासाठी महामंडळाकडे निधी नाही. सरकारची हमी नसल्याने बँकेच्या कर्जाबाबतही अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. यामुळे २७ हजार कर्मचाऱ्यांना मुदतपूर्वनिवृत्ती देणारी योजना तूर्त अधांतरी आहे.

महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारने एक हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. हा निधी महामंडळाच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाही. याबाबत राज्य सरकारमधील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ‘कर्जासाठी राज्य सरकारने महामंडळाला कोणतेही आश्वासन दिलेले नाही. एसटी महामंडळाला आवश्यक निधी यापूर्वी देण्यात आला आहेच. यापुढील काळातही एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडून निधी देण्यात येईल.’ असे त्यांनी स्पष्ट केले.

महामंडळाने खासगी बँकेकडून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. कर्जासाठी सरकार हमी आणि जागा गहाण ठेवणे या दोन्ही अटींची पूर्तता आवश्यक आहे. सरकार हमी देण्याबाबत अद्याप राज्य सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नाही. जागा गहाण ठेवण्यासाठी महामंडळाची तयारी आहे, असे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्वेच्छानिवृत्ती योजना वय वर्षे ५० व त्यापेक्षा जास्त वयाच्या एसटी कर्मचारी व अधिकारी यांना लागू करणे प्रस्तावित आहे. अशा कर्मचाऱ्यांची संख्या २७ हजार इतकी आहे. योजनेला सुमारे १,४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

जुलैमध्ये महामंडळाच्या संचालक मंडळात मंजूर झालेली ही योजना राज्य सरकारच्या मंजुरीनंतर लागू होणार आहे. लॉकडाउन काळात ठप्प झालेल्या एसटीचे नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एसटीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी २७०-२८० कोटी रुपयांचे खर्च येतो. ही योजना लागू झाल्यानंतर दरमहा १०० कोटी इतकी बचत वेतनखर्चात करणे शक्य आहे, असा दावा एसटी अधिकाऱ्यांनी केला आहे.

२७हजारज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर एकूण १०० कोटी खर्च होतात. साधारण ७५ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारावर सुमारे १७०-१८० कोटींचा खर्च होतो. स्वेच्छानिवृत्ती योजनेत योग्य मोबदला मिळाला नाही, तर कामगार संघटनांचा या योजनेला विरोध असेल, असे कामगार संघटनांचे म्हणणे आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

corona infection from food: अन्नातून करोना संसर्ग; ठोस पुराव्यांचा अभाव – corona infection from food but lack of concrete evidence says infectious diseases clinic...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोनाचा संसर्ग अन्नातून किंवा खाद्य पदार्थातून होण्याविषयी आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. गरम पाणी पिणे किंवा बाहेरून घरी...

MNS Morcha against Electricity Bills: MNS Morcha Against Inflated Electricity Bill Live Updates – MNS Morcha Live: मनसेचा झटका मोर्चा; राज्यभरात कार्यकर्ते रस्त्यावर

सर्वसामान्य नागरिकांना आलेल्या वाढीव वीज बिलांच्या विरोधात मनसेनं आज मोर्चाचं आयोजन केलं आहे. अनेक शहरांत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी कार्यकर्ते रस्त्यावर...

ed inquiry in private firm in nashik: नाशिकच्या दोन संस्थाची ‘ईडी’कडून चौकशी – enforcement directorate investigation in cooperative organization and private firm over economic...

आर्थिक गैरव्यवहार व व्यवहारांमधील अनियमितता प्रकरणांत मातब्बरांना घाम फोडणाऱ्या 'ईडी'चे (enforcement directorate ) पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे.  Source link

Recent Comments