Home ताज्या बातम्या औरंगाबादमध्ये भाजपविरुद्ध भाजप! खासदार पुत्रांकडून कार्यकर्त्याला घरात घुसून मारहाण | News

औरंगाबादमध्ये भाजपविरुद्ध भाजप! खासदार पुत्रांकडून कार्यकर्त्याला घरात घुसून मारहाण | News


औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक अजून व्हायच्या आहेत. मात्र, आतापासूनच भाजपमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यावर अनेक राडे होताना दिसत आहे.

औरंगाबाद, 24 मे: औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपच्या खासदार पुत्रांनी एका भाजप कार्यकर्त्याला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे औरंगाबादमध्ये भाजपविरुद्ध भाजप, असं चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा.. रावसाहेब दानवेंचे जावई, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा राजकीय संन्यास

भाजपचे खासदार डॉ.भागवत कराड यांच्या मुलांनी शनिवारी (23 मे) रात्री भाजपचा कार्यकर्ता कुणाल नितीन मराठे (रा.कोटला कॉलनी) यांना घरात घुसून बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर घरातल्या महिलांनाही धक्काबुक्की केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक अजून व्हायच्या आहेत. मात्र, आतापासूनच भाजपमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यावर अनेक राडे होताना दिसत आहे. दरम्यान, हे प्रकरण पक्षातंर्गत असल्याने दोन्ही बाजुंनी समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या प्रकरणी क्रांती चौक  पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

कुणाल नितीन मराठे (वय-25, कोटला कॉलनी)  यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. कुणाल यांनी सांगितलं की, 23 मे रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ते घरी जेवण करत असताना हर्षवर्धन कराड, वरुण कराड आणि पवण सोनवणे आले. तू वार्डमध्ये फिरायचं नाही. कारण आगामी महानगर पालिका निवडणुकीत मला तिकीट मिळणार आहे. लोकांनाही मदत करत जाऊ नकोस, असा दम देत तिघांनी बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्यासह माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला या तिघांपासून धोका असल्याचं कुणाल मराठे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपचे आंदोलन

भाजपनेचे 22 मे रोजी राज्यभरात मेरा आंगण मेरा रणांगण आंदोलन केले. राज्याने आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची मागणी औरंगाबाद भाजपने केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे यांनी दिली.

अतिवृष्टी झाली त्यावेळी राज्यातील शेतकऱ्यांना 25 हजार नुकसान भरपाई मिळाली पाहीजे अशी मागणी करणारे सरकार आता सत्तेत आले तरी, शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास हे सरकार असमर्थ ठरले आहे. औरंगाबाद भाजपाच्या वतीने आयोजित आंदोलनातून सरकारला घेरण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. विविध मुद्द्यांचा हवाला देऊन भाजपाने आघाडी सरकारचे कान टोचण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा.. मठापतीच्या हत्याकांडाने नांदेड हादरलं, मठात घुसून सेवेकऱ्याचीही निर्घृण हत्या

जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजता तसेच प्रत्येक तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात येणार आहे, असे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर व शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी सांगितले.

Tags:

First Published: May 24, 2020 08:43 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

4th Marathi literary meet: संमेलनस्थळी होणार करोना चाचणी – it has been decided to test the corona of every worker those work for marathi...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकशहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष खबरदारी घेतली जात असून, संमेलनाच्या उभारणीसाठी येणाऱ्या प्रत्येक कामगाराची...

Rajesh Tope: आरटीपीसीआरच्या तपासण्या वाढवा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आदेश – rtpcr testing should be increased to prevent coronavirus says health minister rajesh tope

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबादकरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवाव्यात. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष घालावे, असे आदेश...

खुनाचा प्रयत्नप्रकरणी पतीला शिक्षा

म. टा. प्रतिनिधी, चारचाकी घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणत नाही म्हणून विवाहितेचा छळ करून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पती, सासू,...

Recent Comments