Home शहरं औरंगाबाद औरंगाबाद बातमी: किराणा दुकानात खतविक्री! - fertilizer for sale in grocery stores

औरंगाबाद बातमी: किराणा दुकानात खतविक्री! – fertilizer for sale in grocery stores


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

युरियाचा अनाधिकृत साठा करून त्याची विक्री करणाऱ्या विरोधात कृषी विभागाने कारवाई केली. याप्रकरणी एका किराणा दुकानदारासह तीन जणांविरोधात संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली.

अप्रमाणित खतांची विक्री, खतांची चढ्या दराने विक्री होते का हे तपासण्यासाठी कृषी विभागाने मोहीम हाती घेतली आहे. औरंगाबाद तालुक्यातील करंजखेडा या गावात एका किराणा दुकानदाराने बदनापूर तालुक्यातून शेतकरी म्हणून खते खरेदी केले. त्याचा अनधिकृत साठा केला. त्याने गावातील शेतकऱ्यांना खताची बेकायदा विक्री केल्याचे प्रकरण या पथकाने उघडकील आणले आहे. पैठण तालुक्यातही अनधिकृतपणे खताची विक्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

या गावामध्ये दोन विक्रेत्यांची परवाने चार ते पाच वर्षांपूर्वी कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी हा व्यवसाय बंद केला होता. तथापि चालू वर्षातील करोनाच्या पार्श्‍वभूमीवर वाढलेली अचानक मागणी लक्षात घेऊन या विक्रेत्यांनी हा व्यवसाय अनधिकृतपणे सुरू करत खतांचा काळाबाजार व नफेखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. ‘ई-पॉस मशीन’चा वापर न करता व कुठलीही पावती न देता शेतकऱ्यांना खतांची विक्री करणे, अनधिकृत साठा व विक्री करणे आदी प्रकरणी संबंधित तिन्ही व्यक्तींविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती गंजेवार यांनी दिली.

कृषी विभागाने जादा दराने विक्री करणाऱ्या १८ विक्रेत्यांविरुद्ध हंगामापूर्वी कारवाई केली आहे. त्यामुळे कोणत्याही विक्री केंद्रावर रुपये २६६ रुपयांपेक्षा जादा दराने विक्री होताना आढळून आली नाही, असेही त्यांनी नमूद केले.

कुठलेही गावात नफेखोरी करण्याच्या हेतूने कोणी खतांचा अनधिकृत साठा केला असल्यास किंवा विनापरवाना खतांची विक्री चालू असल्यास पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना त्याबाबत तातडीने माहिती द्यावी. संबंधितांविरुद्ध तात्काळ कारवाई केली जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune: Pune: महिला रिक्षामधून प्रवास करत होती, काही अंतरावरच… – pune woman robbed gold jewellery and cash worth rs 1. 5 lakh in bhosari...

पुणे: रिक्षाने प्रवास करत असताना, महिलेच्या पर्समधील दागिने आणि रोकड असा दीड लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी...

Arnab Goswami: अर्णब गोस्वामींवर कारवाई होणार? गृहमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत – maharashtra will take action on arnab goswami: says anil deshmukh

नागपूरः 'भारत बालाकोटवर हल्ला करणार ही माहिती अर्णब गोस्वामीला तीन दिवस आधी कशी कळाली? हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न असून अंत्यत गंभीर बाब...

ind vs eng test: भारत विरुद्ध इंग्लंड: प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार का? BCCIने घेतला हा निर्णय – england tour of india 2021 ind vs...

चेन्नई: ind vs eng भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारे पहिले दोन कसोटी सामने चेन्नईतील चिंदम्बरम स्टेडियमवर होणार आहे. करोनानंतर भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना...

Recent Comments