Home शहरं औरंगाबाद औरंगाबाद बातमी: सांजूळ प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ - sanjul project overflow

औरंगाबाद बातमी: सांजूळ प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ – sanjul project overflow


म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यातील सहा गावांना पाणीपुरवठा करणारे सांजूळ येथील प्रकल्प यंदा जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी भरून ओसंडून वाहू लागला आहे. सांजूळ प्रकल्प पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

सांजूळ प्रकल्पातून पानवाडी, बिल्डा, चिंचोली, सांजूळ यासह औरंगाबाद तालुक्यात चौका या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रकल्प ओसंडून वाहत असल्याने फुलमस्ता नदीतून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन-चार दिवसांपासून दररोज पाऊस पडत असल्याने सांजुळ प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाला आहे.

फुलमस्ता नदीवरील फुलंब्री बंधाऱ्यातही काही प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. जोरदार पावसाने शेतकरी सुखावले आहेत. मात्र, दररोज पाऊस पडत असल्याने मका पिकावर अज्ञात रोग आला आहे, तर कापसासह इतर पिके पिवळी पडत आहेत.

तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून अत्यल्प पाऊस पडत असल्याने दुष्काळचा सामना करावा लागत होता. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने फुलमस्ता, गिरजासह इतर नद्याना पूर आल्याने पाण्याचे संकट काही प्रमाणात दूर झाले होते. यंदा जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक बंधारे भरले व नद्या, ओढे वाहत असल्याने विहिरींची पाणीपातळी वाढली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pathardi leopard attack: Leopard Attack धक्कादायक: चिमुकला आईसोबत बसला होता; बिबट्याने झडप घातली अन्… – leopard attacks four year old boy in pathardi

नगर: आईजवळ बसलेल्या चार वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे आज रात्री आठच्या सुमारास घडली आहे. सार्थक संजय...

Recent Comments