Home मनोरंजन कनिका कपूर : इंटरनेट सर्चमध्ये 'रामायणा'वरही भारी पडली कनिका कपूर - kanika...

कनिका कपूर : इंटरनेट सर्चमध्ये ‘रामायणा’वरही भारी पडली कनिका कपूर – kanika kapoor and ramayan most searched celebrity and keyword during lockdown


मुंबई- करोना व्हायरसमुळे संपूर्ण देश गेले कित्येक दिवस लॉकडाउनमध्ये आहे. या जागतिक महामारीमुळे अनेकांना आपल्याच घरात कैद व्हावं लागत आहे. पण यामुळे अनेकजण ऑनलाइन राहू लागले. याचा परिणाम असा झाला की जगभरात सर्वात जास्त सर्च केलेली भारतीय सेलिब्रिटी म्हणून कनिका कपूरचं नाव पुढे आलं. कदाचित ही गोष्ट अनेकांना खोटी वाटेल पण हेच खरं आहे. सर्वात जास्त सर्च केल्या गेलेल्या नावांमध्ये कनिका कपूर अग्रणी आहे. तीने जेसी गर्ल प्रियांका चोप्रालाही या शर्यतीत मागे टाकलं आहे.

तारिक फतेह तर विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता- जावेद अख्तर

‘याहू इंडिया’च्या आकड्यांनुसार कनिका कपूर करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात तिचं नाव इंटरनेटवर सर्च करण्यात आलं. परदेशातून आल्यानंतर कनिका अनेक पार्टीला गेली होती आणि जवळपास एका आठवड्यानंतर ती पॉझिटिव्ह असल्याचं कळलं होतं. यानंतर सोशल मीडियावर तिला अनेकांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं.

स्त्री- पुरुष दोघांमध्येही पुढे कनिका

करोना व्हायरसमुळेच कनिकाच्या नाव सर्च यादीत सर्वात वर आलं. लोकांना तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होता. जगभरात कनिका असा एक ‘कीवर्ड’ झाली जो सर्वाधिक शोधला गेला. एवढंच नाही सर्च इंजिनच्या डेटानूसार फक्त स्त्रीयांमध्येच नाही तर पुरुषांच्या आकडेवारीपेक्षाही जास्त सर्च कनिका कपूरला मिळाले आहेत.

करोना तर पाठच सोडत नाही- अमिताभ बच्चन

रामायणही सर्च इंजिनमध्ये पुढे

याशिवाय लॉकडाउनमध्ये रामायण पुन्हा सुरू झाल्यामुळे मनोरंजन जगतात ‘रामायण’ शब्द सर्वाधिक सर्चमध्ये आला. सर्च इंजिनच्या माहितीनूसार भारतीय सर्वाधिक मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींचीच नावं शोधतो. त्यामुळे यावेळीही मनोरंजन क्षेत्राशी निगडीत नावांनीच बाजी मारली.





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ms dhoni: महेंद्रसिंग धोनीने पार्टीमध्ये केला भन्नाट डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल… – indian former captain ms dhoni dance in a party, chennai super kings’...

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीला आपण सर्वच कॅप्टन कूल म्हणून ओळखतो. त्यामुळे धोनीला आतापर्यंत कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही नाचताना पाहिले नसेल. पण धोनीचा एक...

Navi Mumbai Municipal Corporation: गुड न्यूज! ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही नाट्यगृहांना मिळणार भाडे सवलत – navi mumbai municipal corporation has decided take discount to...

मुंबई टाइम्स टीमगेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले नाट्यप्रयोग सुरू व्हावेत म्हणून नाट्यसृष्टीकडून विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या प्रयत्नांना...

Srinagar terror attack: Srinagar Terror Attack: महाराष्ट्राचा वीरपुत्र यश देशमुख काश्मिरात शहीद; धक्क्याने आई बेशुद्ध – yash deshmukh martyred in terrorist attack in srinagar

जळगाव: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील २२ वर्षीय जवान यश दिंगबर देशमुख हे शहीद...

Recent Comments