Home मनोरंजन कपिल शर्मा: कपिल शर्माच्या वॅनिटी वॅनची किंमत ऐकून तुम्ही व्हाल हैराण -...

कपिल शर्मा: कपिल शर्माच्या वॅनिटी वॅनची किंमत ऐकून तुम्ही व्हाल हैराण – kapil sharma have expensive vanity van know his car collections


मुंबई– कपिल शर्माचं नाव कोणाला माहीत नाही. आपल्या विनोदबुद्धीसाठी तो देशभरात प्रसिद्ध आहे. अथक मेहनत आणि लोकांना हसवण्याच्या त्याच्या कौशल्याने अगदी थोड्याकाळातच तो यशाच्या शिखरावर पोहोचला. आज कॉमेडी किंग म्हणून त्याची सिनेसृष्टीत ओळख आहे. आज त्याच्या लग्झरीयस लाइफ स्टाइलबद्दल जाणून घेऊ..

कपिलने त्याच्या करिअरची सुरुवात द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेन्ज शोमधून केली होती. या शोने त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली. आता कपिल ‘द कपिल शर्मा शो’ हा स्वतःचा शो करतो. यश मिळाल्यावर प्रत्येकाच्या लाइफस्टाइलमध्ये फरक होतो. तसा तो कपिलच्या लाइफस्टाइलमध्येही झाला. २०१९ मध्ये फोर्ब्सच्या यादीत तो ५३ व्या स्थानावर होता. याचवर्षी त्याने ३५ कोटींचा करही भरला होता. यावरूनच त्याच्या लाइफस्टाइलचा अंदाज येऊ शकतो.

भारतासोबतच्या वादात मनिषा कोईरालाने केलं नेपाळचं समर्थन, भडकले युझर्स


कपिलकडे स्वतःची वॅनिटी वॅन आहे. या वॅनची किंमत जवळपास ५ कोटी ५ लाख रुपये एवढी आहे. असं म्हटलं जातं की, कपिलची ही वॅनिटी वॅन बॉलिवूडमधील सर्वात महागड्या वॅनपैकी एक आहे. या वॅनमध्ये सर्व सुविधा आहेत. विशेष म्हणजे कपिलची ही वॅन DC ने डिझाइन केली आहे. स्वतः कपिलने याबद्दलची माहिती सोशल मीडियावर दिली होती. त्याने वॅनिटी वॅनचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.


याशिवाय कपिलला महागड्या गाडया विकत घेण्याचीही आवड आहे. कपिलकडे अनेक लग्झरी गाड्या आहेत. त्याच्याकडे एक मर्सिडीज गाडी आहे. या गाडीची किंमत १ कोटी १९ लाख रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे वॉल्वो एक्ससी गाडीही आहे. या गाडीची किंमत जवळपास ९० लाख ते १ कोटी ३ लाख रुपये आहे. तसेच कपिलकडे रेन्ज रोवर गाडीही आहे.

निर्मात्याने केली आत्महत्या, २७ व्या मजल्यावरून मारली उडी

एवढंच नाही तर मुंबईत त्याचा एक आलिशान बंगलाही आहे. याशिवाय पंजाबमध्येही भलमोठं घर आहे. या घराची किंमत २५ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. २००७ मध्ये कपिल पहिल्यांदा टीव्हीवर दिसला होता. यानंतर त्याच्या करिअरचा आलेख सतत चढता राहिला.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sunil Gavaskar: IND vs ENG : भारतातील सर्वाधिक क्रिकेट चाहते गुजरातमध्येच आहेत, सुनील गावस्कर यांचं वादग्रस्त विधान – ind vs eng : indian former...

अहमदाबाद, IND vs ENG : गुजरातमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगत आहे. यावेळी समालोचन करत असताना भारताचे माजी कर्णधार आणि...

Kareena Kapoor Khan New Photos From Home Saif Ali Khan – स्वतःसाठी वेळ काढत घरी आराम करताना दिसली करिना कपूर, पाहा फोटो | Maharashtra...

हायलाइट्स:हॉस्पिटमधून घरी आल्यावर आराम करतेय करिना कपूरदुसऱ्या बाळाचा चेहरा पाहण्यास चाहते उत्सुक२१ फेब्रुवारीला दिला दुसऱ्या मुलाला जन्ममुंबई-करिना कपूर खानला नुकताच अजून एक मुलगा...

Sensex rise today: Sensex Today शेअर बाजारात तेजी; सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स वधारला – sensex surge today reclaim 50000 mark

हायलाइट्स:भांडवली बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात तेजी आहे.सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला असून त्याने ५०१०० अंकाची पातळी ओलांडलीराष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवहार तांत्रिक बिघाडामुळे खंडीत...

Recent Comments