Home मनोरंजन करिना कपूर: दुसऱ्या मुलाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन गेले सैफ- करिना, तैमुरही होता...

करिना कपूर: दुसऱ्या मुलाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन गेले सैफ- करिना, तैमुरही होता सोबत – kareena kapoor and saif ali khan leaves breach candy hospital with second child


मुंबई- सैफ अली खान आणि करिना कपूर नुकतच आपल्या दुसऱ्या मुलाला घेऊन घरी गेले. २१ फेब्रुवारी रोजी करिनाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात सिझरिनद्वारे करिनाने दुसर्‍या मुलाला जन्म दिला. दोन दिवसांनंतर इस्पितळातून करिनाला डिस्चार्ज देण्यात आला. स्वतः सैफ अली खान त्यांना घरी नेण्यासाठी इस्पितळात गेला होता. यावेळी त्याच्यासोबत तैमुरही होता.

मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून काही फोटो समोर आले आहेत, यात सैफ आणि करिना गाडीत बसून घरी जाताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये तैमूर सैफच्या मांडीवर बसलेला दिसत आहे. यापूर्वी फॅमिलीचे बरेच सदस्य आणि जवळचे मित्र करीना कपूरला पाहण्यासाठी रुग्णालयात आले होते.

दरम्यान, करिना आणि सैफने २०१२ मध्ये लग्न केलं. लग्नाच्या चार वर्षानंतर करिनाने २०१६ मध्ये तैमूरला जन्म दिला. आता जवळपास चार वर्षांनंतर ती पुन्हा एकदा आई झाली. करिनाने दुसऱ्या बाळाच्या जन्माआधी नवीन घर घेतलं. या घराचं इण्टेरिअरही दोन मुलांच्या गरजांप्रमाणे करण्यात आलं.


लॉकडाउनमध्ये करिनाने ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याची बातमी शेअर केली होती. करिना आणि सैफने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, ‘आमच्या कुटुंबात नवीन पाहुणा येणार आहे हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. तुमच्या सर्व शुभेच्छा आणि आर्शीवादासाठी खूप आभार.’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Beef Racket: अवैधरित्या सुरु होता कत्तलखाना; पोलिसांनी धाड टाकताच…. – beef racket busted in amravati, one arrested

अमरावतीः विना परवानगी गाई ढोरांची कत्तल घडवून अवैधरित्या मास विक्री व्यवसाय चालविणाऱ्या कत्तलखान्यांपैकी एका कत्तलखान्यात धाड टाकून ३ बैल, २ गाई आणि एका...

raj thackeray: तर माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र – raj thackeray open letter to cm uddhav thackeray over nanar...

हायलाइट्स:राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्रनाणार रिफायनरी प्रकल्पावरुन राज ठाकरेंनी लिहलं पत्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली मागणीमुंबईः रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात नाणार येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी...

nashik sahitya sammelan postponed: nashik sahitya sammelan : नाशिकच्या साहित्य संमेलनाला स्थगिती, मे अखेर होणार संमेलन – nashik akhil bhartiya sahitya sammelan postponed

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकः नाशिकमध्ये २६ ते २८ मार्च दरम्यान होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोविडच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय अखिल...

Recent Comments