Home शहरं औरंगाबाद ‘करोना’ची करणी अन् ‘आल्या’ची पेरणी

‘करोना’ची करणी अन् ‘आल्या’ची पेरणी


म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

यावर्षी मान्सूनपूर्व दोन-तीन पाऊस झाल्याने, जूनमध्ये दमदार पावसाला सुरुवात झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या आहेत. खरिपाच्या पेरण्या शंभर टक्के पूर्ण झाल्या आहे. यावर्षी कापूस लागवड शंभर टक्के पूर्ण झाली. मक्‍याचे क्षेत्र घटले आहे असून, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. करोना विषाणू संसर्गाच्या बाजारात आल्याला (आद्रक) मागणी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा आले (आद्रक) लागवडीकडे कल वाढला आहे. पिकांच्या वाढीसाठी आता शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे आहे.

खुलताबाद तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपून घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आले पिकाच्या लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे. आले हे स्थिर व भरपूर मागणी असणारे पीक आहे. यावर्षीची परिस्थिती आशादायक असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आल्याची लागवड केलेली आहे. खुलताबाद तालुक्यात उसाच्या बरोबरीने बागायती पीक म्हणून आद्रक लागवडीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.

यंदा उन्हाळ्यात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे हजारो टन भाजीपाला वाया गेला. ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’मुळे मुंबई, पुणे, सूरत, नागपूर येथील बाजारपेठांत भाजीपाला घेऊन जाणे शेतकऱ्यांना कठीण बनले होते. काही शेतकऱ्यांनी भाजीपाला मार्केटमध्ये विकण्यासाठी नेला. त्यांना ट्रकभाड्याच्या खर्चही मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले. आले या पिकाचे अतिवृष्टी झाली तरी फारसे नुकसान होत नाही. त्यामुळे यावर्षी आल्याची ‘रेकॉर्डब्रेक’ लागवड करण्यात आली आहे. ‘करोना’चा उद्रेक मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे बाजारात आल्याची मागणी वाढणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

खुलताबाद हा तालुका औरंगाबाद शहराजवळील अत्यंत जवळचा तालुका आहे. तालुक्यातील अनेकांची औरंगाबाद शहरात घरे आहेत, मात्र ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर शहरात राहणाऱ्या अनेकांनी ग्रामीण भागात येऊन गावाकडे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेती कामांमध्ये अनेकजण व्यस्त आहेत. अनेक विवाहित महिला गावाकडे माहेरी आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाकडे मजुरांची संख्या वाढली आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात रोजगाराची संधी असल्याने; तसेच यावर्षी पाऊसही चांगला पडत असल्याने अनेकांनी शेतीकडे पाय वळले आहेत. शेती कामासाठी भरपूर मजूर उपलब्ध असल्याने आल्याची निंदणी, अंतर्गत मशागतीची कामे करणे शेतकऱ्यांना आता सोयीचे झाले आहे.

रेदी-विक्री संघामार्फत खत पुरवा

शेतकऱ्यांना लागणारे खते बी-बियाणे राज्य सरकारने खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आणि सहकारी संस्था यांच्या मार्फत खते व बियाणे वाटप करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी विभागामार्फत थेट बांधावर खते उपलब्ध करून देण्याची योजना राबवण्यात आली, मात्र प्रत्यक्षात ही योजना सपशेल फेल ठरली आहे. अनेक शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे खते वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे शासनाने बियाणे खते वाटप करताना कृषी सेवा केंद्रांऐवजी ग्रामीण भागातील सहकारी सोसायट्या; तसेच तालुकास्तरावरील खरेदी विक्री संघामार्फत खतांचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. शासनाने सक्षम सोसायटीमार्फत खतांचा पुरवठा का केला नाही, असा सवालही उपस्थित करीत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

recruitment in ecgc: केंद्र सरकारी नोकरीची संधी; इसीजीसीमध्ये भरती – recruitment in ecgc i.e. export credit guarantee corporation

प्रा. संजय मोरेआजचं युग स्पर्धेचं बनलं आहे. त्यासाठी कठोर परिश्रम आणि योजनाबद्ध प्रयत्न करावे लागतात, याची जाणीव करून देण्याची आवश्यकता वाढली आहे. राज्यात...

health care tips in marathi: Bird Flu Precautions एव्हियन फ्लू म्हणजे काय, सुरक्षित राहण्यासाठी काय करावं? – bird flu precautions tips what is avian...

डॉ. किर्ती सबनीस, संसर्गजन्य रोगतज्ज्ञमागील काही दिवसांत राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश येथे बर्ड फ्लू किंवा एव्हियन फ्लू असल्याच्या बातम्या...

covid 19 vaccine: लसीला नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन रोखण्याचा आदेश, वादानंतर माघार – jharkhand vaccination drive govt employees salary cut order withdrawn

कोरडमा : देशभरात सुरु झालेल्या करोना लसीकरण मोहिमेत काही अडथळे, वादविवाद समोर येत आहेत. झारखंडच्या कोरडमा जिल्ह्यात आरोग्य अधिकाऱ्यांकडून सरकारी कर्मचाऱ्यांना 'लस घेतली...

Recent Comments