Home क्रीडा करोनाच्या राजधानीत IPL रंगणार? बीसीसीआयचा धाडसी विचार!

करोनाच्या राजधानीत IPL रंगणार? बीसीसीआयचा धाडसी विचार!


मुंबई: जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय असलेल्या या टी-२० स्पर्धेच्या १३व्या हंगामाचे आयोजन कधी होणार याची उत्सुकता तमाम चाहत्यांना लागली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात या स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार करत आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारा आयसीसी टी-२० वर्ल्ड कप होणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. आयसीसीकडून अद्याप त्याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी खुद्द आयोजन करणाऱ्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने ही गोष्ट काही दिवसांपूर्वी मान्य केली आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयला आयपीएलच्या आयोजनासाठी वेळ मिळणार आहे.

वाचा-
आयपीएलच्या आयोजनासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने आयपीएलसाठीच्या शहराची निवड केली आहे. IPLच्या १३व्या हंगामासाठी चार स्टेडियम निश्चित केली आहेत.

वाचा-
पीटीआयच्या रिपोर्टनुसार मुंबई शहराचा आयपीएलसाठी विचार करत आहे. या शहरात बायो सिक्योर झोन तयार करून स्पर्धा आयोजन होऊ शकते. करोना व्हायरसमुळे २९ मार्च पासून होणारी आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आता ताज्या रिपोर्टनुसार सप्टेंबर आणि ऑक्टोबर या काळात IPLहोऊ शकते. यातील सर्वात महत्त्वाचा अडथळा म्हणजे आयसीसीने टी-२० वर्ल्ड कप बाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे बीसीसीआयला IPLच्या नियोजनाचा अंतिम निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत.

वाचा-
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत ही स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भातचा विचार अगदी सुरुवातीच्या स्तरावर आहे. ऑक्टोबर महिन्यात जर याचे आयोजन करायचे असेल तर मुंबईतील स्थिती नियंत्रणात हवी. मुंबईत चार सर्वोत्तम स्टेडियम उपलब्ध आहेत. बीसीसीआय आणि स्पर्धेचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोस्टर्स साठी बायो सिक्योर झोन तयार केल्यास सर्व गोष्टी शक्य आहेत.

वाचा-
देशातील सर्वाधिक करोना रुग्ण मुंबईत आहेत. त्यामुळे जर आयपीएलचे आयोजन मुंबईत करायचे असेल तर त्यासाठी करोना स्थिती नियंत्रणात हवी. या स्पर्धेसाठी मुंबईत वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील ही मैदाने उपलब्ध आहेत.

वाचा- …

करोनामुळे मार्च महिन्यापासून क्रिकेट स्पर्धा बंद आहे. सध्या वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दोन्ही देशांतील कसोटी मालिकेमुळे क्रिकेटच्या आयोजनाला बळ मिळेल. अशाच पद्धतीने मुंबईत सुरक्षित झोन करून आयपीएल स्पर्धा होऊ शकेत, असा बीसीसीआयचा विचार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

New Inflation Index For Employees Will Easy To Calculate Dearness Allowance – नोकरदारांसाठी नवा महागाई निर्देशांक; महागाई भत्त्याची सवलत ठरवणे होणार सोपे

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : औद्योगिक आस्थापनांतून, कारखान्यांतून काम करणाऱ्या नोकरदारांसाठी केंद्र सरकारने गुरुवारी नवा महागाई निर्देशांक सुरू केला. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता...

Hingulambika Devi Temple: साडेतीनशे वर्षांचा इतिहास; देवीचे मूळ पाकिस्तानात – three and a half hundred years of history of the hingulambika devi temple

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहराच्या मध्यवस्तीतील म्हणजे रंगारगल्लीतील श्री हिंगुलांबिका देवीच्या मंदिराला ३५० वर्षांचा इतिहास आहे. यंदा करोना परिस्थितीमुळे प्रथमच देवीची मिरवणूक निघणार नाही.नवरात्रात...

Thane: Thane: कामाचे पैसे न दिल्याने प्लंबरने केली कंत्राटदाराची हत्या – man killed contractor at ghodbunder in thane

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : कामाचे १२ हजार रुपये न दिल्याने प्लंबरने कंत्राटदाराची हत्या केल्याची घटना ठाण्यातील घोडबंदर भागात घडली. हत्येनंतर परराज्यात पळून...

Recent Comments