Home देश ‘करोनासह जगणे शिकावे लागेल’

‘करोनासह जगणे शिकावे लागेल’


वृत्तसंस्था, हैदराबाद

‘करोना विषाणूवर सध्या कोणतीही लस वा औषध उपलब्ध नाही. त्यासाठी जगभरात शास्त्रज्ञांकडून प्रयत्न होत आहेत. त्यामुळे करोनावरील औषधाचा शोध लागत नाही, तोपर्यंत आपल्याला करोनासह जगणे शिकावे लागेल,’ अशी भावना तेलंगणचे उद्योगमंत्री के. टी. रामा राव यांनी रविवारी व्यक्त केली.

‘करोना विषाणूवर लस वा औषधचा शोध, त्याचे परीक्षण आणि ते वापरासाठी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला करोनासह जगणे शिकावे लागणार आहे. करोनामुळे जगभरातील अनेक कंपन्या गुंतवणुकीसाठी म्हणून भारताकडे पाहात आहेत. या संधीचा फायदा घेण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना मदत केली पाहिजे. करोनावरील औषधाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन ‘फार्मा सिटी’तील पायाभूत सुविधांसाठी तेलंगण सरकारकडून केंद्राकडे चार हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसे झाले, तर या ‘फार्मा सिटी’ला जागतिक केंद्र बनवू शकू,’ अशी आशा रामा राव यांनी व्यक्त केली.

‘करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजनांची जगभरात प्रशंसा होत आहे. केंद्र आणि राज्याच्या समन्वयाने करोना रोखण्यात भारताला यश मिळाले आहे. त्यामुळे अनेक कंपन्या देशात गुंतवणुकीचा विचार करीत असून, ती आपल्यासाठी एक चांगली संधी आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल गोयल यांना याबाबत पत्र लिहून औद्योगिक क्षेत्रांत अधिक गुंतवणूक करण्याची विनंती केली आहे,’ असे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र केटीआर यांनी सांगितले.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

26/11 Mumbai Attack in Marathi: Mumbai 26/11 attack २६/११ हल्ला: ‘या’ देशात उभारले जाणार स्मारक – Mumbai Terror Attack Israelis Planning Memorial For Victims...

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये...

Mumbai High Court Rejects Plea Of CBI Probe Into Disha Salian’s Death – दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे द्यावा; मुंबई हायकोर्टाने दिले ‘हे’ उत्तर

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या आत्महत्येची फाइल मुंबई पोलिसांनी बंद केल्यानंतर दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा...

Corona Cases in Aurangabad: एका रुग्णाचा मृत्यू; १११ नवे बाधित – aurangabad reported 111 new corona cases and 1 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील पाथरी येथील ७० वर्षांच्या बाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बळींची संख्या...

Maradona Goals Every Football Fans Should Watch His Skills And Abilities – Maradona Goals Video: प्रत्येक चाहत्याने पाहिले पाहिजेत मॅराडोनाच्या सर्वोत्तम गोलचे व्हिडिओ

नवी दिल्ली: फुटबॉल जगातील महान खेळाडू दिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांचे बुधवारी निधन झाले. फुटबॉल जगतातील सर्व चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या मॅराडोनाच्या निधनामुळे...

Recent Comments