Home देश 'करोनासाठी नाही, खोकल्याच्या औषधासाठी पतंजलीला लायसन्स'

'करोनासाठी नाही, खोकल्याच्या औषधासाठी पतंजलीला लायसन्स'


हरिद्वारः करोना व्हायरसवर औषध बनवल्याचा दावा करत योगगुरू यांनी मंगळवारी कोरोनिल हे औषध लाँच केले. पण काही तासांतच पतंजलीचे हे औषध वादात सापडले. केंद्रीय आयुष मंत्रालयाने पतंजलीकडून क्लिनिकल ट्रायलचे रेकॉर्ड मागितले. आयसीएमआरने यासंदर्भात आयुष मंत्रालयाकडे बोट दाखवलं होतं. आता उत्तराखंडमधील आयुर्वेद ड्रक्स लायसन्स अथॉरिटीनेही रामदेव बाबांच्या औषधावर प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे रामदेव बाबांना आणखी एक झटका बसला आहे.

उत्तराखंडमधील आयुर्वेद ड्रक्स लायसन्स अथॉरिटी

रामदेव बाबांची कंपनी पतंजलीला करोनावरील औषधासाठी नाही तर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सर्दी-खोकल्याच्या औषधासाठी लायसन्स मंजूर करण्यात आले होते. करोनावर रामदेव बाबांच्या पतंजलीने औषध बनवल्याची माहिती आपल्याला माध्यमांमधून कळली. पण त्यांना दिलेले लायसन्स हे सर्दी-खोकला आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या औषधासाठी होते, असं उत्तराखंडमधील आयुर्वेद ड्रक्स लायसन्स अथॉरिटीचे उपसंचालक यतेंद्र सिंह रावत यांनी स्पष्ट केलं.

पतंजलीला नोटीस जारी

कुणी करोनाच्या नावार औषध बनवून त्याचा प्रचार आणि प्रसार करू शकत नाही, असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. तसंच आयुष मंत्रालयाच्या वैधतेनंतरच हे परवानगी असेल. उत्तराखंडमधील आयुर्वेद ड्रक्स लायसन्स अथॉरिटीकडून पतंजलीला नोटीस पाठवण्यात आली. या प्रकरणी पतंजलीकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे, असं रावत यांनी सांगितलं.

रामदेव बाबांचा दावा

योगगुरू रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी मंगळवारी एका मोठ्या कार्यक्रमात करोनावर औषध बनवल्याचा दावा केला होता. तसंच या औषधाची क्लिनिकल तपासणीही करण्यात आली. क्लिनिकल तपासणीत औषधाचा परिणाम १०० टक्के झाल्याचं समोर आलं, असं रामदेव बाबा म्हणाले. पण पतंजलीचा हा दावा वादात अडकला. पतंजलीला सर्दी-खोकल्याच्या औषधासाठी लायसन्स दिले गेले होते. पण त्यावर करोनारीवल औषध लाँच केले गेले. आता या प्रकरणी लायसन्स देणाऱ्या उत्तराखंडमधील आयुर्वेद ड्रक्स लायसन्स अथॉरिटीने पतंजलीला नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

raj thackeray without mask: Nashik: मास्क न घालताच राज ठाकरे नाशिकमध्ये; माजी महापौरांना म्हणाले… – mns chief raj thackeray in nashik without wearing mask

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मास्क न घालताच ते आज सकाळी नाशिकमध्ये पोहोचले. मास्कवर मास्क घालून स्वागतासाठी...

chandrkant patil on maratha reservation: नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जा; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा – chandrkant patil attacks on maharashtra government over maratha...

हायलाइट्स:मराठा आरक्षणावरुन भाजप आक्रमकभाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा सरकारला इशारामराठा आरक्षणाचा मुद्द्यांवरुन राजकारण तापलं मुंबई: सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं वाटतचं नाही....

farmers protest in france: Farmers protest फ्रान्समध्येही शेतकऱ्यांचा एल्गार, शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी – french farmers protest against low earnings deplore high suicide...

हायलाइट्स:फ्रान्समध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू, शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी सुपरमार्केट्स आणि वितरण केंद्राबाहेर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलनमागील वर्षी मंजूर झालेल्या कृषी कायद्यामुळेही दिलासा...

Recent Comments